Asian Games 2022 : भारतीय पुरुष संघाचा ट्रॅप नेमबाजीत नवा विक्रम

01 Oct 2023 16:01:33
Mens Team Trap Shooting Won Gold Medal

मुंबई :
भारताने चीनमधील हांगझाऊ येथे सुरू असलेल्या १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या ट्रॅप नेमबाजीत सांघिक सुवर्णपदक जिंकण्याचा विक्रम मोडला. भारताच्या चमूने अंतिम फेरीत चमकदार कामगिरी करत नवा विक्रम रचला आहे. भारताच्या किनान डॅरियस चेनई, जोरावर सिंग संधू आणि पृथ्वीराज तोंडाईमन या त्रिकुटाने या स्पर्धेत एकूण ३६१ गुणांसह सुवर्णपदक पटकावले.

दरम्यान, भारतीय संघाने पुरुषांच्या ट्रॅप सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून नेमबाजीतील त्यांच्या पदकतालिकेत भर घातली. यावेळी भारताने ३६१ गुणांसह १९९४च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कुवेतच्या ३५७ पेक्षा जास्त गुणांसह ट्रॅप सांघिक स्पर्धेत एक नवीन विक्रम रचला.


Powered By Sangraha 9.0