ठाणे : भाजपाच्या माजी नगरसेविका नम्रता जयेंद्र कोळी यांच्या निधीतून माता रमाबाई विश्राम कट्टा, आकर्षक तिरंगा पॉईंट आणि कॉलेज कट्टा उभारण्यात आला आहे. भाजपाचे आ. संजय केळकर, आ. निरंजन डावखरे आणि जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या हस्ते माता रमाई चौकात नुकतेच पॉईंट व कट्ट्याचे लोकार्पण करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडाअंतर्गत विविध उपक्रमांत प्रभाग क्रमांक २२ मध्ये करण्यात आलेल्या या कामांचे लोकार्पण करण्यात आले. माता रमाबाई विश्राम कट्ट्याच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना विश्रामाची सोय उपलब्ध झाली आहे. तर तिरंगा पॉईंटच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या छायाचित्रासह तरुणांना सेल्फी घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
चांद्रयान-२ मोहिमेत विक्रम लॅंडर दुर्घटनाग्रस्त झालेल्या ठिकाणाला तिरंगा पॉईंट व चांद्रयान-३ मोहीमेत विक्रम लॅंडर उतरलेल्या ठिकाणांना शिवशक्ती पॉईंट नाव देण्यात आले आहे. या पॉईंटपासून प्रेरणा घेऊन तिरंगा पॉईंट उभारला आहे, अशी माहिती माजी नगरसेविका नम्रता कोळी यांनी दिली. आ. संजय केळकर व आ. निरंजन डावखरे यांच्या हस्ते विश्राम कट्टा, तिरंगा पॉईंट आणि कॉलेज कट्ट्याचे लोकार्पण करण्यात आले.
या वेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, माजी नगरसेवक सुनील हांडोरे, माजी नगरसेविका मेघना हांडोरे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष जयेंद्र कोळी, सागर भदे, सरचिटणीस मनोहर सुगदरे, सचिन पाटील, रश्मी मोरे, विशाल वाघ, भाई सोनावणे, गणेश कांबळे, मेघना अडसुळे, अरुणा कांबळे, भाजपाचे पदाधिकारी नरेश ठाकूर, नितेश तेली, प्रतिक सोलंकी, विजेंद्र चटोले, मीनाक्षी मिस्त्री, सुनिता भोईर, राणी मेमन, निलोफर शेख आदींसह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.