Asian Games 2022 : गोल्फर अदिती अशोकला रौप्यपदक; अदिती म्हणते, भारतात गोल्फला....

01 Oct 2023 15:37:40
Golfer Aditi Ashok Won Silver Medal

मुंबई : भारताची अव्वल गोल्फर अदिती अशोकने १९ व्या आशियाई क्रीडास्पर्धेत रौप्यपदकाची कमाई करत भारताच्या पदकतालिकेत आणखी एका पदकाची भर घातली. अदित अशोकने चागंला खेळ करत सुवर्णपदक मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले परंतु, तिला अखेर रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले.


दरम्यान, आपल्या कामगिरीवर गोल्फर अदिती अशोक म्हणाली, “मला असे वाटते की गोल्फसाठी याचा अर्थ काहीतरी आहे, आणि आशा आहे की, भारतात परत याला अधिक समर्थन आणि मान्यता मिळेल आणि भारतीय महिला संघालादेखील. तसेच, मला वाटते की आम्ही चौथ्या स्थानावर आहोत, एका पदकापासून एक स्थान दूर आहे आणि ते सर्व सकारात्मक आहे. ", असे अदिती अशोक म्हणाली.

अदिती पुढे म्हणाली, "या प्रकारचे कार्यक्रम नियमित गोल्फ स्पर्धांपेक्षा खूप वेगळे आहेत. फक्त चांगली कामगिरी करणे, मी यापूर्वी कधीही न खेळलेल्या कोर्सवर खेळणे,आशा आहे की या अनुभवामुळे काहीतरी चांगले होईल", असा विश्वास अदिती अशोकने यावेळी व्यक्त केला.


Powered By Sangraha 9.0