प्रदेशाध्यक्ष बावनकुळे करणार राज्यव्यापी ओबीसी जागर यात्रेचा शुभारंभ

    01-Oct-2023
Total Views |
BJP Chandrashekhar Bawankule President On Wardha Tour

महाराष्ट्र :
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान राज्यव्यापी ओबीसी जागर यात्रेची सुरूवात करणार आहेत. दरम्यान, दि. २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त वर्धा जिल्हाचा दौरा करणार आहेत. यावेळी भाजप संघटनात्मक कार्यक्रमांसह महात्मा गांधींना वंदन करून सेवाग्राम येथून राज्यव्यापी ओबीसी जागर यात्रेचा शुभारंभ करणार आहेत.

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे वर्धा जिल्हा प्रवासाची सुरुवात सेलू येथून करणार आहेत. ते सकाळी ९ वा. सेलू येथे आरोग्य शिबिराचे उद्घाटन करतील. सकाळी ९.३० वा. पवनार येथे व सकाळी १० वा. मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत रथयात्रेत सहभागी होतील. सकाळी १०.१५ वा. सेवाग्राम आश्रम येथे बापू कुटीला भेट देतील. सकाळी ११.३० वा. आजनसरा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनास उपस्थित राहतील. दुपारी १ वा. हिंगणघाट येथे निखाडे मंगल कार्यालयात आयोजित ओबीसी जागर यात्रेच्या भव्य मेळाव्यात सहभागी होऊन येथून ते ओबीसी जागर यात्रेचा पहिल्या टप्प्याचा शुभारंभ करणार आहे. ही यात्रा विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यात पोहचणार आहे.

त्यांच्या या दौऱ्यात राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराजजी अहीर, ओबीसी मोर्चा राष्ट्रीय महामंत्री व महाराष्ट्र प्रभारी खा.संगमलाल गुप्ता, भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रभारी डॉ. आशिषराव देशमुख, ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष संजय गाते,खा.रामदास तडस,आ.रामदास आंबटकर, आ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार, आ.दादाराव केचे,जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व भाजपा कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.