मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद नेहमीच कमी कपडे घालते म्हणून चर्चेत असते. परंतु तिने आता कपडे न घालण्यामागचे खरे कारण सांगितले आहे. आपल्याला एक कातडीचा आजार आहे ज्यामध्ये आपण कपडे घालू शकत नसल्याचे तिने सांगितले आहे. कपडे घातल्यानंतर आपल्या शारीवरवर लालसर चट्टे उठत असल्याचे ती म्हणाली.
भाजप प्रवक्त्या चित्रा वाघ यांनी उर्फीवर टीका केल्यानंतर काही दिवस त्याच्यात वाक्युद्ध झाले. त्यानंतर उर्फीने आपल्या इंस्टाग्राम हॅन्डलरवरून आपले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटो मध्ये तिच्या शरीरावर चट्टे दिसत असून तिने त्याखाली कॅप्शनही लिहिले आहे. त्यात ती म्हणते, "हे पहा, ही मला समस्या आहे, ज्यावेळी मी लोकरीचे किंवा पूर्ण कपडे घालते, तेव्हा मला अशा प्रकारची ऍलर्जी होते. हा आता तुमच्यासमोरपुराव ठेवते आहे. यामुळे मी अर्धे जकपडे घालते किंवा नग्न राहते. कारण नमला कपड्यांची ऍलर्जी आहे."