नरेंद्र पाठक यांची साहित्य अकादमीच्या परिषदेवर सदस्यपदी निवड

    07-Jan-2023
Total Views |

pathak
नरेंद्र पाठक
मुंबई : डॉक्टर नरेंद्र पाठक यांची साहित्य अकादमीच्या समितीवर सदस्यपदी निवड झाली. १ जानेवारी २०२३ पासून ३१ डिसेम्बर २०२७ पर्यंत, पाच वर्षे समितीचा कालावधी असणार आहे. साहित्य विषयातून पाठकांवर यानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भारताच्या साहित्य क्षेत्रातील सर्वोच्य संस्थेच्या सदस्यपदी निवड झाल्याने नरेंद पाठक यांनी आनंद व्यक्त केला. मुंबई तरुण भारतशी बोलताना आपले पुढील मनसुबे तसेच साहित्य विश्वात सध्या होत असलेल्या घडामोडींविषयी आले मत त्यांनी सांगितले.
 
पाठक म्हणाले, "साहित्य विश्वात बऱ्याच वर्षांपासून एका विशिष्ट विचारधारेचा पगडा आहे. अकादमीसाठी काम करताना राष्ट्रीय विचारधारेच्या पुस्तकांना प्रवाहात आणता येईल. आज आपण पहिले तर संशोधनपर पुस्तकांसाठी कोणतेही पुरस्कार अकादमीने जाहीर केलेले नाहीत. या संशोधनपर पुस्तकांना आणि नव्या संशोधकांना वाव देता येईल. शासनाचे फंडस्, कार्यशाळा, पुरस्कार या सर्वांचे योग्य नियोजन करता येईल." साहित्य विश्वाला नवी दिशा देण्याचा मानस सांगताना साहित्य क्षेत्राविषयी असलेली त्यांची कळकळ दिसून आली.
 
काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने अनुवादित पुस्तकांसाठी फ्रॅक्चर्ड फ्रिडम या पुस्तकाला अनावधानाने पुरस्कार जाहीर केला होता. पाठकांनी निवड समितीची चुक समोर आणून त्याबद्दल आपली तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांच्या कर्तव्यदक्ष वक्तव्याची दखल घेत अकादमीने लगेचच परिषदेच्या सदस्यत्वासाठी त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला.