मुंबईच्या रस्त्यांवर नंगानाच सुरू ठेवायचा आणि याला स्वातंत्र्य म्हणायचं? : चित्राताई वाघ

"चाकणकरांना अजितदादांनीच सुनावलं ते बरं!", उर्फी जावेदवरुन चित्राताईंनी घेरलं

    07-Jan-2023
Total Views |

Chitra Wagh





मुंबई
: उर्फी जावेद प्रकरणी राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतलेल्या भूमिकेवरुन विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सुनावले आहे, अशी माहिती भाजप महिला मोर्चा अध्यक्षा चित्राताई वाघ यांनी दिली. पत्रकार परिषदेत उर्फी जावेदसह महिला आयोगाने घेतलेल्या भूमिकेचाही समाचार घेतला. "उर्फी जावेद सारख्यांनी जर सार्वजनिक ठिकाणी सैराचार केला तर समाजात जबाबदारीने वागणाऱ्या महिलांचा अपमान होत नाही का?", असा सवालही त्यांनी उपस्थित केला.


"तुमच्या खासगी आयुष्यात तुम्ही काय करावं याबद्दल ज्याचं त्याला स्वातंत्र्य आहे. पण सार्वजनिक ठिकाणी वावरताना, भर रस्त्यावर चालताना होणारा हा नंगानाच महाराष्ट्रातील संस्कृती आहे का?, असा प्रश्न त्यांनी उर्फी जावेदला विचारला होता. त्यांच्याच पक्षाच्या एका आमदार महिलेने हाच विषय काढला होता की, कपड्यांच्या दुकानाबाहेरील पुतळ्यांना स्त्रियांचे अंतर्वस्त्र का लावले जाते?, असा जाब त्यांनी वरच्या सभागृहात विचारला होता. त्यावेळी त्यांना जर मेनिक्विन्स आक्षेपार्ह वाटत होते मग याबद्दल भूमिका कशी बदलली?", असा सवालही चित्राताईंनी विचारला आहे.


पुन्हा सांगते विरोध त्या उर्फी जावेदला नाही तर तिच्या सुरू असलेल्या नंगानाच बंद व्हावा यासाठी आहे. आपल्या प्रत्येकाला लेकी बाळी आहेत. कुठला आदर्श ठेवणार आहोत आपण? कुठला आदर्श आपण आपल्या मुलींना दाखवणार आहोत? ही माझी भूमिका आहे. म्हणून या सार्वजनिक स्वैराचाराला खतपाणी घालू नका, हे मला पुन्हा सांगायचंय यामध्ये मला सगळ्यात जास्त आवडली भूमिका ती आमच्या अजितदादांची रोखठोक भूमिका मांडली. दादा म्हणले आम्ही महिलांना पद देतो. म्हणजे त्यांच्या पक्षातल्या हो बरोबर ना. आता त्याचं सोनं करायचं का माती करायचं त्यांनी ठरवायचं त्यांच्या लक्षात आलंय माती चालली आहे. त्यामुळे दादांनी ज्या पद्धतीने भूमिका मांडली त्याचा अर्थ फार चांगला आहे तो त्यांना पटलंय असल्यास स्वैराचाराला पाठीशी घालायचं काय काम आहे? आणि समाज स्वास्थ्य अधिक महत्वाचं आहे.", असेही ते म्हणाले.


मी माझी भूमिका मांडली त्यावर रुपाली चाकणकर यांनी काय उत्तर दिली? आमची भूमिका स्पष्ट आहे. असला नंगानाच महाराष्ट्रात होऊ देणारच नाही. याचा शेवटपर्यंत पाठपुरावा करणारच आहोत. पण एका जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तींकूनही तशा अपेक्षा आहेत. यापूर्वीही त्या पदावर तशा अनेक महिलांनी काम केलंयं. त्यांनी आपल्या कामाचा चांगला ठसा उमटवला. चांगला कुणीही अशा पद्धतीच्या विकृतीला खतपाणी घातलेले नाही. तुम्हाला इतका कसला आकस आहे?, असा सवाल त्यांनी चाकणकर यांना विचारला आहे. सामाजिक स्वास्थ बिघडत असेल तर त्याविरोधात आवाज उठवायला नको का?, असा सवालही त्यांनी विचारला.


"माझ्याकडे हा विषय जेव्हा आला तेव्हा एक महिला सातत्याने पाठपुरावा करत होती. माझ्या त्या क्षेत्राशी काहीही संबंध नाही. पण एका भगिनीने मला ताई तुम्ही या विषयावर आवाज उठवायला हवा, असे सांगितले. तेव्हापासून याचा सोक्षमोक्ष लावण्याचा निर्धार आम्ही केला आहे आणि तो लावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. त्यांनी ताईंनी मला व्हॉट्सअपवर एक व्हीडिओ पाठविला होता. तो पाहून मी हैराण झाली. ही कोण आहे? मी पुन्हा त्या ताईंशी बोलली, तिने सांगितलं, चित्राताई माझी दीड वर्षांपूर्वी माझ्या नऊ वर्षाच्या मुलीवरती अतिशय वाईट प्रकार झालाय, तिच्यावर अत्याचार झालायं. अजूनही आम्ही त्यातून बाहेर पडलेलो नाही. अशा वेळेला मुंबईमध्ये हे अशी विकृती हा नंगा नाच उघडेपणाने चाललायं तुम्हाला दिसत नाही. आणि तुम्ही याच्यावर बोलणार नाही. त्या दिवशी मला कळलं की ही बाई कोण आहे? त्याचं महिलेने मला इन्स्टाग्राम लिंक पाठविल्या आणि मी हैराण झाले होते.", अशी माहितीही त्यांनी दिली.


"माझ्याकडे अशा छप्पन नोटीशी आहेत. मला महिला आयोगाने नोटीस पाठविल्याचे दुःख नाही. पण ही आपली संस्कृती आहे का? तुम्ही तुमच्या खासगी आयुष्यात हवे तसे फोटो काढा. इन्स्टाग्रामवर फोटो काढून टाका ते तुमचं खासगी आयुष्य आहे. पण अशापद्धतीने नंगानाच आम्ही मुंबईच्या रस्त्यांवर कसा चालू देऊ? याला तुम्ही व्यक्ती स्वातंत्र्य म्हणता? आम्ही सगळ्यांनी डोळे बंद करून बसावं तर ते मात्र काही शक्य नाही बरं का अजिबात शक्य होणार नाही ", असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.