माझा घात-पात होऊ शकतो : सुषमा अंधारे

06 Jan 2023 12:19:29
 
sushma andhare
 
 
 
मुंबई : चंद्रपूरमध्ये एका सभेला संबोधित करताना शिवसेना ठाकरे गट उपनेत्या सुषमा अंधारे यांनी माझा घातपात होऊ शकतो, असे खळबळजनक विधान केले आहे. माझ्याविरोधात तक्रारी दाखल होतील. आगामी काळात माझ्यावर काही संकटं येऊ शकतात. मात्र मला त्याची पर्वा नाही. मला वाटतं की माणसं जागी झाली पाहिजेत. काही लोक, अधिकारी मला सांगतात की, रात्रीचा प्रवास टाळा. घात-अपघात होऊ शकतो, असं विधान सुषमा अंधारेंनी केलं आहे.
 
 
काही दिवसांपुर्वी सुषमा अंधारेंनी वारकरी संप्रदायातील काही किर्तनकारांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. त्यांच्या विधानामुळे राज्यातील वारकरी संप्रदाय नाराज झाल्याचं बोललं जात होतं. यानंतर त्यांनी भागवत संप्रदायातील संतपरंपरेला वाटत असेल, मी चुकत आहे. पण, मी एकाही पक्षाची, राजकीय नेत्याची माफी मागितली नाही, कारण ती माझी स्टाईल आहे. तरीसुद्धा कळत नकळत माझ्या बोलण्याने वारकरी संत सांप्रदायाच्या भावना दुखावल्या असतील, तर क्षमा मागण्यासाठी काही गैर वाटणार नाही, असं त्या म्हणाल्या होत्या.
 
 
दरम्यान आपल्या अपघाताची भीती व्यक्त करताना त्या म्हणाल्या, "आतापर्यंत अपघातात अनेकजण गेले आहेत. तुमच्यावर आरोप करण्यासारखे त्यांच्याकडे काहीच नाही. त्यामुळे ते तुम्हाला थेट गोळी घालण्याऐवजी तुमचा अपघात घडवून आणू शकतात. माझी प्रतिकात्मक तिरडी बांधू देत किंवा प्रत्यक्ष तिरडी बांधू देत, मी मात्र माझं काम प्रमाणिकपणे करण्याचे ठरवलेले आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0