'क्राईम पेट्रोल'मध्ये 'आफताब'चा धर्म बदलला! सोनी पिक्चर्सला नोटीस

06 Jan 2023 17:46:04

Crime Petrol





मुंबई : 'क्राईम पेट्रोल' या मालिकेत श्रद्धा वालकर हत्याकांडावर आधारित भाग चित्रित करताना आरोपी आफताब पुनावालाचा धर्म बदलून दाखविण्यात आला. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचे वकील ओमकार पाटील यांनी सोनी पिक्चर्स, दिग्दर्शक, निर्मात्यांसह ११ जणांना नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. २८ डिसेंबर २०२२ रोजी सोनी टिव्हीवर प्रदर्शित करण्यात आला होता. २१२ क्रमांकाचा 'अहमदाबाद-पुणे मर्डर केस' हा एपिसोड या कार्यक्रमाचे नियमित प्रेक्षक असलेल्या रविंद्र दाभोळकर यांना हा भाग पाहून धक्काच बसला. हा भाग श्रद्धा वालकर प्रकरणातील आहे हे स्पष्ट होते.
'सिनेमॅटीक लिबर्टी'च्या नावाखाली आफताब पूनावाला या आरोपीचे पात्र बदलून मिहीर, एक योगा प्रशिक्षक असे बदलण्यात आले. तसेच श्रद्धा वालकरचे पात्र बदलून अॅना डिसूजा, असे बदलण्यात आले होते. तसेच मिहीरची आई मंदिरात जाऊन पूजा अर्चना करतानाचा प्रसंगही दाखविण्यात आला आहे. तसेच श्रद्धा-आफताब प्रकरणातील मूळ घटना दाखविण्यापेक्षा मिहीर आणि अॅनाचे हिंदू प्रथेप्रमाणे झालेले लग्न दाखविण्यात आले आहे. अशाप्रकारे मालिकेचा भाग तयार करून आरोपी हा हिंदू असल्याचे भासविण्याचा प्रयत्न निर्माते-दिग्दर्शकांनी केल्याचेही या नोटीशीत म्हटले आहे. या भागावरुन दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्नही केला जात असल्याचेही म्हटले आहे.
क्राईम पेट्रोल सारख्या मालिकांमध्ये मूळ अतिरंजक करण्यासाठी पटकथाकार काहीसे स्वातंत्र्य घेतात. मात्र, या प्रकारात वेगळाचा अजेंडा चालविण्याचा प्रयत्न दिसून आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. सत्य घटनांवर आधारित असलेल्या या मालिकेत धार्मिक छेडछाड का करण्यात आली आहे? टेलिव्हीजन क्षेत्रात अशाप्रकारे मालिकेचा भाग करून हिंदूंवर आघात करण्याचा प्रयत्न केला जात आहे का? ७२ तासांत या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देऊन या प्रकरणी तातडीने चॅनलने माफी मागवी अन्यथा मानहानीसह पुढील कायदेशीर कारवाईसाठी तयार रहावे, असा इशाराही देण्यात आला आहे.
Powered By Sangraha 9.0