नारायण राणेंचा थेट इशारा; संजय राऊतांची पुन्हा जेलवारी होणार?

06 Jan 2023 19:32:08


नारायण राणेंचा थेट इशारा; संजय राऊतांची पुन्हा जेलवारी होणार?
सिंधुदुर्ग : केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दि.६ जानेवारी रोजी कणकवली येथील पर्यटन महोत्सवाच्या मंचावरून संजय राऊतांना इशारा देत,संजय राऊत यांनी २६ डिसेंबरला लिहलेल्या सामनातील अग्रलेखाचे कात्रण मी जपून ठेवले आहे. मी त्यांच्यावर खटला दाखल करुन त्यांना पुन्हा जेलवारी घडवून आणेन,असे राणे यांनी म्हणटले आहे.
ठग-पेंढाऱ्यांचे राज्य! या मथळ्याखाली २६ डिसेंबरचा अग्रलेख प्रकाशित झाला होता. यात नारायण राणेंचा उल्लेख न करता म्हटलं होतं की, "सिंधुदुर्गात रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकुश राणेंचा खून पचवणारे दुसऱ्यांकडे बोट दाखवतात. या तिन्ही खुनांच्या तपासासाठी फडणवीस एखादी एसआयटी नेमणार असतील तर कोकणातले १०० सांगाडे पुरावे म्हणून त्या एसआयटीसमोर स्वत:च हजर होती. पण फडणवीस ते करणार नाहीत." असे सामनाच्या लेखात लिहलेले होते.
तसेच राणे म्हणाले की,२६ डिसेंबरचा अग्रलेखही माझ्या लक्षात आहे. मी संजय राऊत यांना असाच वाऱ्यावर सोडणार नाही. मी त्यांच्याविरोधात न्यायालयात खटला दाखल करेन. संजय राऊत १०० दिवस आर्थर रोड तुरुंगात राहिले, ते १०० दिवस त्यांना कमी वाटले असावेत. त्यामुळे राऊतांना पुन्हा तुरुंगात जावेसे वाटत असेल. मी त्यांच्या तुरुंगात परत जाण्याचा रस्ता मोकळा करतोय, असे नारायण राणे म्हणाले.
दरम्यान, संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर पलटवार करत थेट धमकीवजा इशारा दिला आहे. मला असल्या धमक्या देऊ नका आणि माझ्या नादी लागू नका, अन्यथा ते तुम्हाला खूप महागात पडेल. याशिवाय तुमची जुनी प्रकरणे उकरून काढली तर तुम्ही पन्नास वर्षे जेलमध्ये राहाल,असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.
Powered By Sangraha 9.0