महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रभाकर मोरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश

31 Jan 2023 18:08:47
 
 
मुंबई : सिनेअभिनेते आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा या रियालिटी शो मधून प्रसिद्ध झालेले प्रभाकर मोरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांची सांस्कृतिक विभागाचे कोकण विभाग अध्यक्षपदी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. दरम्यान या ठिकाणी पुणे फिल्मफेस्टीवलमध्ये निवड झालेले 'मदार' सिनेमाचे निर्माते मच्छिंद्र धुमाळ यांचाही सन्मान करण्यात आला.
 

more 
 
अजित पवारांनी त्यांचे स्वागत करताना त्यांच्या चिपळूणबाबत गौरवोद्गार काढले. यावेळी पक्षाच्या सांस्कृतिक कोकण विभागाची अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे ती जबाबदारी ते समर्थपणे पेलतील असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.
 
 
Powered By Sangraha 9.0