'अमृत उद्यान' पहायला जायचंयं? जाणून घ्या प्रवेश प्रक्रिया

    31-Jan-2023
Total Views |
जगप्रसिद्ध मुघल गार्डन चे नामांतर अमृत उद्यान असे करण्यात आल्यानंतर रविवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते याचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतरही ३1 जानेवारीपर्यंत खास व्यक्तींसाठी हे उद्यान राखीव ठेवण्यात आलं. २८ जानेवारी रोजी सर्व शेतकऱ्यांसाठी उद्यान खुले राहिले, २९ जानेवारी रोजी दिव्यांगांना उद्यानात प्रवेश दिला, ३० जानेवारीला सर्व सैनिक आणि पोलिसांसाठी दरवाजे उघडे होते तर. ३१ जानेवारीला सर्व आदिवासी महिला आणि स्वसाहाय्यता करणाऱ्या गाताना उद्यानात प्रवेश होता. त्यानंतर आजपासून सर्व जनतेसाठी उद्यान सुरु होत आहे.

amrut udyan 
 
अमृत उद्यानात प्रवेश कसा मिळवाल?
उद्यानात प्रवेश ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून मिळू शकेल. ऑनलाईन प्रवेश घेणे शक्य नसल्यास, सुविधा काउंटर किंवा राष्ट्रपती भवनाच्या गेट क्रमांक १२ वर कियोस्क ठेवले आहेत, त्यातून रजिस्ट्रेशन करून आपले तिकीट आपण घेऊ शकता. मात्र गर्दी टाळायची असल्यास राष्ट्रपती भवनाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन नोंदणी करता येऊ शकते. संकेतस्थळाची माहिती- संकेतस्थळ - rashtrapatisachivalaya.gov.in
ऑनलाईन नोंदणीसाठी दुवा - rb.nic.in/rbvisit/visit_plan.aspx
 
उद्यानात केव्हा प्रवेश मिळेल?
३१ जानेवारीनंतर सर्व जनतेसाठी उद्यान खुले राहील. परंतु दर सोमवारी स्वच्छतेच्या कारणास्तव उद्यान बंद असेल. सकाळी १० वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत या उद्यानात सर्वाना प्रवेश करता येईल. तसेच ८ मार्च रोजी होळी असल्याकारणाने एक दिवस उद्यान बंद असेल.
 
उद्यानात कसे जाल?
केंद्रीय सचिवालय, सेंट्रल सेक्रेटरिएट हे उद्यानाच्या जवळचे मेट्रो स्टेशन आहे. रेल भवनच्या मार्गाने निघाल्यानंतर आपल्याला गेट क्रमांक ३५ पर्यंत पायी चालावे लागेल. नॉर्थ एव्हेन्यू राष्ट्रपती भवनला जोडलेल्या प्रेसिडेंट इस्टेटच्या गेटमधून या उद्यानात प्रवेश आणि निकास मिळेल.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.