रा.स्व.संघ स्वयंसेवक भास्करराव सटाणकर यांचे निधन

31 Jan 2023 18:08:10

Bhaskarrao Satankar





मुंबई
: रा. स्व. संघाचे स्वयंसेवक भास्करराव सटाणकर यांचे मंगळवार दि. ३१ जानेवारी रोजी पहाटे निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. त्यांना ह्रदय विकाराचा तीव्र झटका आला. भास्करराव सटाणकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाशिकचे ज्येष्ठ स्वयंसेवक होते.  वनवासी कल्याण आश्रम शाळेचे त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. सुरगाणा येथील आश्रम शाळा विकसित करण्यात त्यांचे महत्वाचे योगदान आहे. माजी आरोग्य मंत्री दिवंगत दौलतराव आहेर यांना विधान सभा निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता गंगापुर रोड येथील गणपती मंदिर हे त्यांच्याच प्रयत्नांमुळे बांधण्यात आले. त्या ठिकाणी ते अनेक सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक इत्यादी कार्यक्रम राबवित असत व्यवसायाने ते नाशिक मधील एक सुप्रसिद्ध विकासक होते. त्यांच्या अकाली निधनाने नाशिक मधे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी, असा परिवार आहे.




Powered By Sangraha 9.0