भारतात येणार दक्षिण आफ्रिकेतील चित्ते

30 Jan 2023 17:59:03

leopard


मुंबई (प्रतिनिधी) :
भारताच्या सध्या सुरू असलेल्या चित्ता पुनर्प्रदर्शन योजनेचा एक भाग म्हणून फेब्रुवारीत (पुढील महिन्यात) दक्षिण आफ्रिकेतुन १२ चित्ते भारतात पाठवण्यात येणार आहे. या १२ चित्त्यांच्या येण्याने भारतात पुन्हा दाखल झालेल्या चित्त्यांची एकूण संख्या २० होईल.

सप्टेंबर २०२२ मध्ये नामीबियातून मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्क येथे पाच मादी आणि तीन नर अशा आठ चित्त्यांना आणण्यात आले होते. फेब्रुवारीमध्ये आफ्रिकेतून होणाऱ्या १२ चित्त्यांच्या आयतीनंतर पुढील ८ ते १० वर्षांसाठी दरवर्षी आणखी १२ चित्ते स्थानांतरीत केले जातील अशी माहिती पर्यावरण मंत्रालयाने दिली आहे.

सुरुवातीला, या १२ चित्त्यांना (केएनपी) मध्ये स्थानांतरीत केले जाईल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या ताज्या सामंजस्य करारावर ट्विट करताना पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले, "पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारचे दूरगामी संरक्षण परिणामांसह चित्तांचे पुनर्संचयित करणे ही प्राथमिकता आहे. दक्षिण आफ्रिकेतील चित्तांचे स्वागत करण्यासाठी भारत उत्सुक आहे."
Powered By Sangraha 9.0