"आपल्या देशाइतके स्वातंत्र्य मुस्लिमांना कुठेच नाही !"

    30-Jan-2023
Total Views |
 
Ponmala Abdulkhader Musliar
 
मुंबई : देशातील मुस्लिमांच्या स्थितीबाबत अनेकवेळा प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. दरम्यान, भारत हा मुस्लिमांना इस्लामिक कार्य करण्याचे स्वातंत्र्य देतो, असा दुसरा देश नाही, असा दावा पोनमाला अब्दुलखदेर मुसलियार नावाच्या एका मुस्लिम विद्वानाने केला आहे. ते म्हणाले की, जोपर्यंत भारत आहे तोपर्यंत परदेशातही मुस्लिमांना इस्लामिक कार्य करण्याचे स्वातंत्र्य दिले जात आहे,
 
मुसलियार हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (मार्क्सवादी) एका सुन्नी मुस्लीम संघटनेशी संबंधित आहेत. मुसलियार म्हणाले की, “आखाती देशात देखील मुस्लीम सामुदायाला इस्लामिक कामं करण्यासाठी जितकं स्वातंत्र्य मिळत नाही जितकं भारतात सहज मिळतं.”
 
पोनमाला अब्दुलखदेर मुसलियार संपूर्ण केरळ जाम-इय्याथुल उलमाचे (कांथापुरम एमपी अबूबकर मुसलियार खंड) सचिव आहेत. ते रविवारी कोझिकोडेमधील एपी खंडाच्या सुन्नी स्टुडंट्स फेडरेशनच्या बैठकीत बोलत होते. ते म्हणाले की, “तुम्ही जेव्हा जगभरातील वेगवेगळे देश पाहता तेव्हा लक्षात येतं की, भारतासारखा दुसरा कोणताही देश नाही. इस्लामिक कामं करण्यासाठी इथं पूर्ण स्वातंत्र्य मिळतं. आखाती देशांमध्ये देखील इतकं स्वातंत्र्य मिळत नाही.”
 
सुन्नी खंड आययूएमएल नेतृत्वाने पोनमाला मुसलियार यांच्या वक्तव्यावर आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, ‘इस्लामिक कामं करण्याचं स्वातंत्र्य ही आपल्या संविधानाची ताकद आहे.” आययूएमएलचे प्रदेशाध्यक्ष सैय्यद सादिक अली शिहाब थंगल म्हणाले की, “येथील मुस्लीम सामुदायाला देशात कोणत्याही प्रकारच्या धोक्याचा सामना करावा लागत नाही, कारण या देशाचं संविधान खूप मजबूत आहे.”
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.