शरयुतिरी आरतीसाठी मुख्यमंत्री लवकरच करणार अयोध्या दौरा !

03 Jan 2023 19:31:06



शरयुतिरी आरतीसाठी मुख्यमंत्री लवकरच करणार अयोध्या दौरा !
मुंबई : उत्तर प्रदेशातील अयोध्या शहरात रामाचे भव्य मंदिर उभारले जात आहे. शिवसेनेत बंडखोरी होण्याआधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या सर्व आमदारांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला जाण्यापासून रोखले होते. नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी अयोध्येला जाण्याची घोषणा केली. अयोध्येतील महंत शशिकांत दास महाराज, शत्रुघन दास महाराज तसेच छबिराम दास महाराज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट घेतली. या भेटीत त्यांनी शिंदेंसह बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील सर्व खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांना अयोध्येला येण्याचं निमंत्रण दिलं.
 
 
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "अयोध्या हे श्रद्धास्थान आहे. मी तिथे नक्कीच जाईन. ऑगस्ट 2020 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणीचे भूमिपूजन केले. याआधी नोव्हेंबर 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अनेक दशकांपासून प्रलंबित असलेला वाद सोडवून अयोध्येत राम मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा केला होता."
हिंदुत्ववादी विचार पुढे घेऊन जात राज्यात सत्तांतर घडल्यानंतर मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद घेण्यासाठी अयोध्येला यावं, अशी इच्छा या भेटीत महंतांनी व्यक्त केल्याचं शिंदेंनी सांगितलं. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ते अयोध्येला जातील. याभेटीवेळी खासदार राहुल शेवाळे, नरेश म्हस्के हेदेखील उपस्थित होते. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली.
Powered By Sangraha 9.0