पालकमंत्री लोढांचा मोठा निर्णय! टिपू सुलतानचं नाव हटवलं

27 Jan 2023 12:49:37

mangal prabhat lodha

tipu sultan raw - Image Source - MTB 


मुंबई
: मालाड मधील क्रीडा संकुल तथा उद्यानाला टिपू सुलतानाचे नाव देण्याचा घाट महाविकास आघाडीच्या माध्यमातून तत्कालीन पालकमंत्री असलम शेख यांनी घातला होता. बहुसंख्य हिंदुत्ववादी संघटना आणि भाजपने केलेल्या विरोधाला डावलून तत्कालीन मविआ सरकारने मालाडमधील उद्यानाला टिपूचे नाव दिले होते.


27 January, 2023 | 13:2

अखेरीस या प्रश्नी उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महत्त्वपूर्ण पाऊले उचलली असून जिल्हा प्रशासनाला आदेश देत उद्यानाला देण्यात आलेले क्रूरकर्मा टिपू सुलतानाचे नाव हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत स्थानिक खासदार भाजप नेते गोपाळ शेट्टी यांनी या संदर्भात पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासनाकडे या संदर्भात मागणी करून निर्णय घेण्याची विनंती केली होती. अखेरीस सरकारने या बाबत निर्णय घेतला असून टिपू सुलतानच्या उदात्तीकरणाला थेट ब्रेक लावण्याचे काम सरकारकडून करण्यात आले आहे.

27 January, 2023 | 13:2


Powered By Sangraha 9.0