साहित्य संमेलनात मान्यवरांची वेगळी चूल

24 Jan 2023 12:53:27

sammelan
 
मुंबई : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात तीन दिवस खवैय्यांची चंगळ असणार आहे. नुकताच झालेल्या बैठकीत तीनही दिवसांचे मेनू जाहीर झाल्यानंतर जेवणगृहात गर्दी होऊ नये म्हणून संभाव्य पाहुण्यांसाठी व्यासपीठाला लागून वेगळे जेवणघर उभारण्यात येणार असल्याचे समजते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती संमेलनाला लाभेल असे गृहीत धरून त्यांना जेवणगृहापर्यंत जायला लागू नये म्हणून वेगळ्या जेवणगृहाची व्यवस्था केल्याचे आयोजक म्हणाले.
 
 
24 January, 2023 | 13:29
 
वर्धेचे पोलीस अधीक्षक नुरुल हसन व सहाय्यक पोलीस अधिकाऱ्यांनी संमेलन स्थळी भेट देत सुरक्षेच्या दृष्टीने उद्घाटन व अन्य प्रेक्षागृहाच्या उभारणीची पाहणी केली. मुख्यमंत्री आल्यानंतर त्यांचा प्रवेश मार्ग, भोजनस्थळ, भेटीगाठी कुठे होणार, याबाबत आयोजकांनी पोलीस अधीक्षकांना माहिती दिली. व्यासपीठ ते भोजन कक्ष यात बरेच अंतर असल्याचे दिसून आले. अभियंता महेश मोकलकर यांनी व्यवस्था चोख असेल असे सांगत पाहुण्यांची गैरसोय होणार नसल्याची हमी दिली.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0