पठाणच्या निषेधार्थ बजरंग दलाने हटवले पोस्टर्स

    24-Jan-2023
Total Views |
 
मुंबई : पठाण चित्रपटाला सोशल मीडियावरून विरोध होत असताना चित्रपट प्रदर्शनाची तारीख जवळ येऊन ठेपली आहे. बुधवारी दिनांक २५ फेब्रुवारी रोजी चित्रपट प्रदर्शित होणार असून प्रमोशन करणारे पोस्टर्स सिनेमागृहांत लागले आहेत. त्यांचा निषेध म्हणून बजरंग दलाने हे पोस्टर्स तातडीने हटवण्याची मागणी केली.
 

pathan 
 
पुण्यातील शिवाजी नगर येथील राहुल थिएटर्स येथे चित्रपटाचे मोठे पोस्टर्स लावण्यात आले होते. हि पोस्टर्स पाहून बजरंग दलाने गोंधळ घालत सर्व पोस्टर्स उतरविण्यास भाग पडले. राहुल चित्रपटगृहाकडूनही बजरंग दलाच्या विनंतीला मन देत लगेचच पोस्टर्स उतरवली गेली. हा निषेधाचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होतो आहे.
 
काही दिवसांपूर्वी 'पठाण' या चित्रपटातील 'बेशरम रंग' हे गाणं रिलीज करण्यात आलं होतं. या कलाकारांच्या चाहत्यांना हे गाणं पसंत पडलं असलं, तरी काही लोकांनी या गाण्यावर आक्षेप घेत कडाडून विरोध केला आहे. गाण्यामध्ये दीपिका पादुकोणने परिधान केलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीमुळे आमच्या भावना दुखावल्याचा आरोप ठिकठिकाणी करण्यात येत आहे. त्यामुळे हा सर्व वाद सुरु झाला होता. हे प्रकरण सेन्सॉर बोर्डाकडे पाठवण्यात आलं होतं. यावेळी सेन्सॉर कमिटीने गाण्यात बदल करुन रिलीज करण्याचा आदेश दिला आहे.
 
या चित्रपटाला होणार विरोध निवळायचे नाव घेत नाही. त्यामुळेच उद्याच प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळतो ही पाहण्याची गोष्ट ठरणार आहे.
 
24 January, 2023 | 12:15
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.