फुकट्यांना नेटफ्लिक्सचा दणका

    24-Jan-2023
Total Views |
 
मुंबई : नेटफ्लिक्स ओटीटी प्लॅटफॉर्म नवनवीन व खुमासदार कथानक असलेल्या वेब सिरीज घेऊन येते. त्यामुळे मनोरंजन क्षेत्रात नेटफ्लिक्सचा नेहमीच बोलबाला होत राहिला आहे. आजही अनेक उत्तमोत्तम मालिका नेटफ्लिक्स तयार करत आहे.
 

netfix 
 
आपल्याकडे एक अकाउंट असेल आणि ४ गॅजेट्स असतील तर चारही गॅजेट्सवरून आपण आपला आवडता शो पाहू शकत होतो. अशावेळी एकल अकाउंट फक्त ४ च इलेकट्रोनिक गॅजेट्स वरून आपण पाहू शकतो एवढीच मुभा नेटफ्लिक्सने दिली होती. त्यानंतर ४ मित्र किंवा एका कुटुंबातील ४ व्यक्ती एकत्रितपणे पासवर्ड शेअर करून एक शो पाहू शकतात. परंतु या वर्षात असे करून चालणार नसल्याचेंटफ्लिक्सने सांगितले आहे.
 
24 January, 2023 | 12:51
 
 
नेटफ्लिक्सच्या सीईओने येत्या वर्षात हा नियम बदलला जाणार असल्याचे सांगितले आहे. या वर्षी फुकट नेटफ्लिक्स वापरणार्यांना मोफत सेवा मिळू नये म्हणून एका व्यक्तीसाठी एकाच गॅजेटवर सेवा देणे क्रमप्राप्त राहील असे म्हंटले आहे. कमी पैशात वर्गणी काढून जे तरुण नेटफ्लिक्स वापरत आहेत, त्यांना पूर्ण पैसे भरल्याशिवाय नेटफ्लिक्स वापरता येणार नसल्याचे सांगितले गेले आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.