गांधी गोडसे चित्रपटावर तुषार गांधींची टीका

गांधी गोडसे वादाला सुरुवात - राजकुमार संतोषींनी पोलिसांकडे मागितली अतिरिक्त सुविधा

    24-Jan-2023
Total Views |
 
मुंबई : "या चित्रपटातून आरोपीचे उदात्तीकरण केले आहे. आणि म्हणूनच हा चित्रपट पाहण्यात काहीही रस नाही." असे उद्गार गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी केले. अभिनेते दीपक अँटनी आणि अभिनेता चिन्मय मांडलेकर करत असलेल्या 'गांधी गोडसे- एक युद्ध' या चित्रपटावरसुद्धा नाराजीचे पडसाद उठताना दिसत आहेत.

rajkumar santoshi  
 
चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार संतोषी याना जीवे मारण्याची धमकी आल्याचे त्यांनी पोलिसांना कळवले. त्याचसोबत आपल्याला अतिरिक्त सुरक्षा मिळावी अशी मागणीही त्यांनी पोलिसांकडे केली आहे. फक्त आपल्यालाच नव्हे तर आपल्या कुटुंबियांनाही त्रास होण्याची शक्यता आहे असे ते यावेळी म्हणाले. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी इच्छा त्यांनी पोलीस स्थानकात व्यक्त केली.
 
 
24 January, 2023 | 17:14
 
राजकुमार म्हणाले, "20 जानेवारी रोजी माझ्या टीमसोबत मी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला गेला. मुंबईतील अंधेरी याठिकाणी ही पत्रकार परिषद सुरू होती. त्यावेळी एक गट तिथे आला आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यामुळे आम्हाला पत्रकार परिषद थांबवावी लागली"
 
24 January, 2023 | 17:15
 
 
गांधी गोडसे- एक युद्ध’ या चित्रपटाचं प्रमोशन आणि रिलीज नाही थांबवलं तर त्याचे परिणाम चांगले नसतील, अशाही धमक्या मिळाल्याची तक्रार त्यांनी पोलिसांकडे केली. ‘मी तुम्हाला विनंती करतो की मला आणि माझ्या कुटुंबातील इतर सदस्यांना त्वरित अतिरिक्त सुरक्षा पुरविण्यात यावी. जर अशा लोकांना मोकळं सोडलं आणि त्यांच्याविरोधात काही पावलं उचलली नाहीत, तर ते खूप मोठं नुकसान करू शकतात. असे ते यावेळी म्हणाले.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.