शरीरप्रकृती आणि रोगप्रवणस्थिती

    24-Jan-2023
Total Views |
 
Physiology and predisposition
 
 
शरीरप्रकृतीचा अभ्यास हा निसर्गात असणार्‍या घटकांशी खूपच निगडित आहे. कारण, आपणांस माहीतच आहे की, शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेले असते. त्यामुळे निसर्गातील घटकांचा शरीरातील बदलांवर मूलभूत घटक आणि त्यांच्यातील बदल व 'Our body mind is prone to certain natural elements.' म्हणजेच माणसातील घटक हे निसर्गाच्या घटकांशी संलग्न असतात, हे समजूनच घ्यायचे झाले, तर असे पाहा की, माणसाचे शरीर हे पृथ्वी, जल, वायू, आकाश आणि अग्नी या मुख्य पाच घटकांनी बनलेले असते. हेच पाच मुख्य घटक निसर्गातही आहेत. निसर्ग हा आनंद आहे. अवाढव्य व मोजमाप न करण्याइतका प्रचंड आहे. म्हणूनच निसर्गातील हे मूलभूत घटकही अमाप व प्रचंड आहेत. त्याच्या समोर मानवी शरीर म्हणजे अणुरेणू समान आहेत. परंतु, ‘जे पिंडी तेच ब्रह्मांडी’ या तत्त्वानुसार निसर्गाचीच ऊर्जा प्रत्येक शरीरात प्रवाहित असते.
 
फक्त नैसर्गिक मूलभूत घटकांची ऊर्जा मात्र माणसाच्या शरीरातील ऊर्जेच्या मानाने अनंत व अफाट असते आणि ऊर्जेच्या तत्त्वानुसार ही ऊर्जा नेहमी ‘पॉझिटिव्ह चार्ज’पासून ‘निगेटिव्ह चार्ज’कडे प्रवाहित होत असते. त्याचप्रमाणे अतिप्रचंड अशा नैसर्गिक उर्जेकडून ऊर्जा ही माणसाच्या शरीराकडे प्रवाहित होत असते. जसे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे ऊर्जा प्रवाहित होते. आता शरीरामध्ये काही अनुकूल वा प्रतिकूल बदल हे होत असतात. हे बदल शरीरातील या मूलभूत घटक द्रव्याच्या शरीरातील प्रमाणावर अवलंबून असतात. उदाहरणार्थ, शरीरातील वायूचे प्रमाण जर गरजेपेक्षा जास्त झाले, तर आपण त्याला ‘वातप्रकृती’ असे म्हणतो. जर शरीरातील जलतत्त्वाचे प्रमाण कमी-जास्त झाले, तर शरीरात त्याचे दुष्परिणाम दिसून येऊ लागतात. म्हणजेच काय तर निसर्गातील या सर्व घटकांचे संतुलन शरीरात असणे, हे फारच गरजेचे असते व हे संतुलन ठेवण्याचे कार्य करते शरीरातील चैतन्यशक्ती. डॉ. रॉबर्ट्स म्हणतात- ''body and tissues are not life, but they are the channels through which the life functions.''
 
चैतन्यशक्तीचे महत्त्व सांगत असताना डॉ. सॅम्युएल हॅनेमान आपल्या ‘ऑरगेनॉन ऑफ मेडिसीन’ या ग्रंथात लिहितात-
''In the healthy condition of man, the spiritual vital force (autocracy), the dynamis that animates the material body (organism), rules with unbounded sway, and retains all the parts of the organism in admirable, harmonious, vital operation, as regards both sensations and functions, so that our indwelling, reason-gifted mind can freely employ this living, healthy instrument for the higher purposes of our existence.''
 
शेवटी सर्व उर्जेच्या रुपातच गणले जाते. आपली मनाची शक्ती हीदेखील एक ऊर्जा व कंपनशक्तीच आहे. निसर्गातील कंपने आणि आपल्या शरीरातील कंपने यांचा खोलवर अभ्यास निकोला टेस्ला सारख्या दिग्गज शास्त्रज्ञांनीही केला होता. पुढे आपण शरीरप्रकृतीबद्दल अजून उपयुक्त माहिती पाहूया. (क्रमश:)
 
 
 डॉ. मंदार पाटकर
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.