शौर्याच्या पराकाष्ठेला वयाचे बंधन नसते !

    24-Jan-2023
Total Views |
जगात ज्या ज्या वेळी शूर बालकांचा उल्लेख केला जाईल त्या प्रत्येक वेळी बाबा जोरावर सिंह जी आणि बाबा फतेह सिंह जी यांचे नाव आदराने घेतले जाईल. गुरुगोविंद सिंग जी यांच्या या मुलांनी वयाच्या अवघ्या सातव्या आणि नवव्या वर्षी धर्माच्या रक्षणार्थ हौतात्म्य पत्करले. त्यांच्या शौर्याच्या सन्मानार्थ यंदा 26 डिसेंबर रोजी देशाने पहिला 'वीर बाल दिवस' साजरा केला. पौराणिक युगापासून आधुनिक काळापर्यंत शूर मुलांच्या आणि मुलींच्या कर्तुत्वातून भारताच्या परंपरेचे प्रतिबिंब दिसत राहिले आहे. देशातील बालकांना शौर्याच्या या कहाणीचा परिचय घडवून देणाऱ्या 'वीर बाल दिवस' कार्यक्रमात 26 डिसेंबर रोजी दिल्लीमधील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले.....
 
 
Narendra Modi
  
 
कित्येक पिढ्यांपासून ज्या दिवसाचे आणि ज्या बलिदानाचे स्मरण करत आला आहे, त्याला एकत्रितपणे एक राष्ट्र म्हणून बाल दिवस साजरा करत एक नवी सुरुवात झाली आहे. पराकोटीच्या शौर्याला वयाचे बंधन नसते, याची आठवण 'वीर बाल दिवस' आपल्याला करून देव राहील. दहा गुरुचे योगदान काय आहे आणि देशाच्या स्वाभिमानासाठी शीख परंपरेचे बलिदान काय आहे, याचे स्मरण हा दिवस करून देत राहील, भारत काय आहे आणि भारताची ओळख काय आहे. हे आपल्याला वीर बाल दिवस सांगेल.
 
'वीर बाल दिवस' कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "वीर साहेबजादे यांच्या चरणी अभिवादन करत मी त्यांच्या प्रती कृतज्ञ श्रद्धांजली अर्पण करतो. 26 डिसेंबर हा दिवस वीर बाल दिवस म्हणून साजरा करण्याची संधी आम्हाला मिळाली, हे आमच्या सरकारचे सौभाग्य आहे, असे मी मानतो." एकीकडे लाखो लोकांची फौज आणि दुसरीकडे एकटे असूनही नीदरपणे उभे ठाकलेले गुरुचे वीर साहेबजादे ! हे वीर साहेबजादे कोणाच्याही धमकीला घावरले नाहीत, कोणाच्याही समोर झुकले नाहीत. अन्याय आणि अत्याचाराच्या विरुद्ध बाबा जोरावर सिंह जी आणि बाबा फतेह सिंह जी यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.
 
 
"साहेबजादा जोरावर सिंह जी आणि साहेबजादा फतेह सिंह जी
यांनी धर्माच्या  प्रामाणिक मार्गाचा त्याग करण्याऐवजी मृत्यू स्वीकारला.
'वीर बाल दिवस' म्हणजे या दोघांच्या साहस आणि न्यायाप्रतीच्या
संकल्पाला समर्पक श्रद्धांजली आहे."
 
नरेंद्र मोदी, पंतप्रधान
 
  
Narendra Modi 
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "आपण सर्वांनी एकत्र येऊन वीर बाल दिवसाचा संदेश देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत न्यायचा आहे. साहेबजादे यांच्या जीवनाचा संदेश देशातील प्रत्येक बालकापर्यंत पोहोचावा आणि त्यापासून प्रेरणा घेऊन ही बालके देशासाठी समर्पित नागरिक व्हावीत, यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे. आपल्याला भविष्यात भारताला यशाच्या शिखरांवर घेऊन जायचे असेल, तर आपल्याला भूतकाळातील संकुचित दृष्टिकोनापासून मुक्त वे लागेल. म्हणून स्वातंत्र्याच्या काळात देशाने गुलामगिरीच्या मानसिकतेपासून मुक्ती मिळवण्याचा संकल्प केला आहे. 'वीरबाल दिवस देशाच्या त्या पंच-प्रण साठी प्राणवायुप्रमाणे आहे. ज्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्याच्या तटबंदीवरुन देशासमोर ठेवला होता.
 
 
देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन
 
• संपूर्ण देशात असे अनेक कार्यक्रम आयोजित केले गेले, ज्यात मान्यवर व्यक्तींनी साहिबजादांची जीवनगाथा आणि बलिदान
यावर संदेश दिला.
 
• साहिबजादा यांच्या शौर्याबाबत नागरिकांना विशेषतः लहान मुलांना अवगत करण्यासाठी देशभरात परस्पर संवाद आणि सहभागावर आधारित कार्यक्रमांचे आयोजन.
 
 
| देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये प्रश्नमंजुषा, निबंध स्पर्धा, लघुपटाचे प्रदर्शन आणि विशेष संमेलनाचे
आयोजन.
 
रेल्वे स्थानक, पेट्रोल पंप, विमानतळ यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी साहिबजादांच्या बलिदानावर आधारित डिजिटल प्रदर्शनाचे आयोजन.
 
 
Narendra Modi
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ऐतिहासिक कार्यक्रमांमध्ये सहभाग
 
● पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे 3,000 मुलांच्या संचलनाला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी, 300 बाल कीर्तनकारांनी सादर केलेल्या 'शब्द कीर्तन' कार्यक्रमाला उपस्थित राहिले.
 
 
 
 
26 डिसेंबर 'वीर बाल दिवस' घोषित
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 जानेवारी 2022 रोजी गुरु श्री गोबिंद सिंह जी यांच्या प्रकाश पर्वानिमित्त तसेच साहिबजादा जोरावर सिंह जी आणि साहिबजादा फतेह सिंह जी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 26 डिसेंबर हा दिवस 'वीर बाल दिवस' म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती. याच दिवशी साहिबजादा जोरावर सिंह जी आणि साहिबजादा फतेह सिंह जी यांना एका भिंतीत जिवंत गाडल्यामुळे ते शहीद झाले होते. या दोन्ही महान बालकांनी धर्माच्या तत्त्वांपासून विचलित होण्यापेक्षा मृत्यूला प्राधान्य दिले. त्यांची आई गुजरी, श्री गुरु गोविंद सिंह जी आणि चार साहिबजादांचे शौर्य आणि आदर्श लाखो लोकांना शक्ती प्रदान करतात. ते अन्यायापुढे कधी झुकले नाहीत. जग सर्वसमावेशक आणि सामंजस्यपूर्ण असावे, असे त्यांना वाटत होते.
 
 
'राष्ट्र प्रथम'चा मंत्र होता.
 
गुरु गोविंद सिंह जी यांचा दृढ संकल्प
 
'व्यक्तीपेक्षा विचार मोठा, विचारापेक्षा राष्ट्र मोठे', 'राष्ट्र प्रथम' चा मंत्र गुरु गोविंद सिंह जी यांचा दृढ संकल्प होता. ते लहान असतानाच राष्ट्र धर्माच्या रक्षणासाठी मोठे बलिदान देण्याची गरज आहे, असा प्रसंग निर्माण झाला. त्यांनी आपल्या वडिलांना सांगितले की आज तुमच्यापेक्षा महान कोण आहे ? तेव्हा हे बलिदान तुम्ही द्या. ते पिता झाले, तेव्हा राष्ट्र धर्मासाठी आपल्या मुलांचेही वलिदान देण्यात त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. त्यांची मुले शहीद झाली तेव्हा ते आपल्या सहकाऱ्यांना म्हणाले - 'चार मूये तो क्या हुआ, जीवत कई हजारा' म्हणजे माझी चार मुले मरण पावली तर काय झाले? सोबत असलेले हजारो सहकारी, हजारो देशवासीय माझी मुलेच आहेत. 'राष्ट्र प्रथम' हे तत्त्व सर्वोच्च स्थानी ठेवण्याची ही परंपरा ही खूप मोठी प्रेरणा आहे.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.