दिल्ली महापालिका – महापौर निवड प्रक्रियेत पुन्हा गदारोळ!

24 Jan 2023 18:01:24
 
नवी दिल्ली : दिल्ली महानगरपालिकेच्या महापौरपदाची निवड मंगळवारीदेखील होऊ शकलेली नाही. दिल्ली महानगरपालिकेच्या बैठकीमध्ये नगरसेवकांच्या शपथविधीनंतर आप आणि भाजप नगरसेवकांनी गदारोळ घातला. नगरसेवकांच्या सततच्या गदारोळानंतर सभागृह तहकूब करण्यात आले.
 

Delhi Municipal Corporation 
 
महासभेमध्ये झालेल्या गदारोळानंतर महापौर निवडीची प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. त्याचवेळी नवीन महापौर निवडून येईपर्यंत दिल्ली महानगरपालिकेचे पीठासीन अधिकारी सत्या शर्मा हे काम पाहणार आहेत. यापूर्वी ही निवडणूक ६ जानेवारी रोजी होणार होती, मात्र आम आदमी पक्ष आणि भाजप यांच्यातील गदारोळामुळे ही निवडणूक होऊ शकली नव्हती.
 
  जरुर वाचा :
 
 
24 January, 2023 | 18:3
 
मंगळवारी सभागृहाचे कामकाज सुरू झाले. यावेळी आप नगरसेवकांनी ‘शेम शेम’च्या घोषणा देण्यास प्रारंभ केला. या गदारोळातच मध्ये सर्व नामनिर्देशित सदस्यांना शपथ देण्यात आली. त्यानंतर निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांनी शपथ घेतली. त्याचवेळी शपथविधी समारंभात भाजप नेत्यांनी ‘जय श्री राम’ आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या. या घोषणाबाजीनंतर दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी गदारोळ सुरू केला. त्यामुळे महापौर निवडीची प्रक्रिया पुन्हा पुढे ढकलण्यात आली असून नवी तारिख पीठासीन अधिकारी सत्या शर्मा घोषित करणार आहेत.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0