साहित्य संमेलनात खाद्यपदार्थांची चंगळ ! वाचा काय आहे मेनू

23 Jan 2023 20:11:01
 
food
 
 
मुंबई : ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०२३ येथे यावर्षी अनेक नव्या खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सचीही भर पडली आहे. वर्धा येथे होणाऱ्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात यावर्षी अनेक नव्या खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सचीही भर पडली आहे. साहित्य संमेल दिवसांवर येऊन ठेपले असताना वर्ध्यात आयोजन मंडळाच्या बैठकांना गर्दी होऊ लागली आहे.
 
नुकत्याच झाल्या बैठकां अहवालानुसार यावर्षी पुस्तकं व प्रकाशकांच्या स्टॉल्स शिवाय ५५ अधिक स्टॉल्स तयार होत आहेत. विविध सरकारी कार्यालयांसाठी २५ स्टॉल्स राखीव ठेवले आहेत. त्याचबरोबर बाहेरून येणाऱ्या साहित्य रसिकांसाठी वर्ध्यातील खाद्यसंस्कृती दाखवणारे तब्ब्ल ३० स्टॉल्स परिसरात असणार आहेत. २०२३ हे वर्ष भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केल्यानंतर भरड धान्यपासून बनवलेल्या पदार्थांचे खास स्टॉल्स इथे पाहायला मिळतील.
 
या सर्वांचा विचार करत जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत सर्व स्टॉल्सवर फक्त पोषक धान्यापासून बनवणारे पदार्थ असायला हवेत अशी ताकीद स्थानिक स्टॉल्सधारकांना दिलेली आहे. अन्नपदार्थांसोबतच अनेक महत्वाच्या मुद्द्यांची चर्चा बैठकीदरम्यान झाली. वाहतूक, परिवहन, निवास इतर बाबी ही या बैठकीत चर्चिल्या गेल्या.
 
मुख्य भोजन मंडपातील दर दिवशीचा मेनू सुद्धा ठरला
उद्घाटनाच्या पहिल्या दिवशी तीन फेब्रुवारीला सकाळी नाष्ट्यात उत्तपम, गार्डन इडली, मैसूर वडा, बनारसी चुरामटर व दालबदाम शिरा राहणार आहे. दुपारच्या जेवणात पनीर अकबरी, वेज कोल्हापुरी, डाळफ्राय, मिस्सीपुरी, मिस्सीपराठा, स्ट्रॉबेरी रसमलाई, मावावाटी, दहीवडा व कॉर्नकटलेट आहे. रात्रीच्या जेवणात लच्छेदार रबडी, केसरकाॅईन जलेबी व सीताफळ छेनापाईज हे तीन मिष्ठान्न, तसेच अन्य पदार्थांत इंदुरी दहीवडा, मिक्स पकोडे, कढाई पनीर, मेथी मटर मलाई व हैदराबादी वांगे राहणार. शिवाय साेबतीला झुनका, बिस्कीट भाकर, कढी, दाळ मखनी, गट्टे पुलाव, वाफवलेला भात, मिनी तंदुरी, फुलका, मिस्सीपुरी व स्टिक मलाई कुल्फी आहे.
 
 
23 January, 2023 | 20:15
 
दुसऱ्या दिवशी चार फेब्रुवारीला सकाळी नाष्ट्यात इंदोरी पोहा, चना मोट, तिखट चिवडा, मिनी आलुकोफ्ता व वेजी सेन्डविच आहे. या दिवशी शनिवार म्हणून उपवास असणाऱ्यांसाठी भगरपुलाव, दही, साबुदाणा वडा, फराळी चिवडा व विलायची केळी मिळणार. दुपारच्या जेवणात फ्रुट श्रीखंड, गुलाबजामून, मिश्रदालवडा, मटर कचोरी, मटर पनीर, सावजी कोफ्ता, दाळभाजी, दाळतडका, दमतवा सावजी व फुलके असा बेत आहे.
 
उपवासास राजगिरा पुरी, आलुशिरा, आलुसाग, फ्रेश फ्रुट, साबुदाणा खिचडी ठेवण्यात आली आहे. रात्रीच्या जेवणात पुरणपोळी, केसर रसगुल्ला, वेजकटलेट, जोधपुरीवडा, पनीर बटर मसाला, मलाईकोफ्ता, सेवटमाटर, दालजीरा, दालतडका, व्हेज बिर्यानी, फुलका, मिनीतंदुरी, बटर पोळी असे ताट सजणार.
 
पाच फेब्रुवारीला नाष्ट्यात ब्रेडरोल, बडवापुरी, आलुकोहळे साग, व्हेज उपमा, चटणी, दिलजानी असा आहार आहे. तर दुपारच्या जेवणात फ्रुट कस्टर्ड, खवापुरी, मिनी मटर काेफ्ता, मद्रासी पकोडा, पनीर पसंदा, काश्मिरी कोफ्ता, दाळयलो, दाळ फंटीयर, वाफवलेला भात, मसाला पुलाव व कढी असा मुख्य बेत आहे. रात्रीस केसर चमचम, ड्रायफ्रुट हलवा, पंप मटर, सावजी पनीर, मसाला वांगे, आलूमेथी मटर, दाळतडका, स्पेशल पुलाव, फुलका व दोन प्रकारचा पराठा राहणार. संमेलनाच्या पूर्वसंध्येला दोन फेब्रुवारीला येणाऱ्यांना जलेबीसह साधे जेवण मिळणार आहे.
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0