सरकारी कर्मचाऱ्यांना अर्थसंकल्पातून मिळणार हे 'गिफ्ट'

23 Jan 2023 16:09:59
निर्मला सीतारामन


मुंबई
: 'अर्थसंकल्प (Budget)२०२३' हा १ फेब्रुवारीला सादर केला जाणार आहे. या वेळी अर्थसंकल्पात सरकारी कर्मचाऱ्यांना दोन भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) अर्थसंकल्पात कर्मचाऱ्यांच्या पगाराचा फिटमेंट फॅक्टर बदलण्याची घोषणा करू शकतात. याबरोबर हाऊस बिल्डिंग अलाउंस अॅडव्हान्स देखील २५ ते ३० लाख रुपयांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. फिटमेंट फॅक्टर वाढल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान वेतनात वाढ होऊ शकते.
मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, सातव्या वेतन आयोगांतर्गत वेतन सुधारणांबाबत दीर्घकाळ चर्चा सुरू आहे. पुढील वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टरद्वारे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात सुधारणा होऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. सरकारी कर्मचार्‍यांचे पगार दर १० वर्षांऐवजी दरवर्षी वाढले पाहिजे, असे सरकारचे मत आहे. त्यामुळे खालच्या पदावर बसणाऱ्या कर्मचाऱ्यांना वरच्या पदावर बसणाऱ्या अधिकाऱ्यांइतकाच पगार मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.अशा परिस्थितीत कर्मचार्‍यांच्या वेतन सुधारणेसाठी सरकार बजेटमध्ये (Budget) नवीन फॉर्म्युला आणू शकते.


23 January, 2023 | 16:16


२०२३ च्या अर्थसंकल्पात(Budget) केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांसाठी घर बांधणी भत्ता संदर्भात दोन मोठ्या घोषणा होऊ शकतात. सरकार भत्त्याची आगाऊ रक्कम आणि त्यावर आकारले जाणारे व्याज दोन्ही वाढवू शकते. सध्या केंद्रीय कर्मचारी घर बांधण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी २५ लाख रुपयांपर्यंत एचआर अॅडव्हान्स म्हणून सरकारकडून घेऊ शकतात. सध्या घरबांधणी भत्त्यावरील व्याजदर ७.१ टक्के आहे. २०२३ च्या अर्थसंकल्पात (Budget), निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) HBA चा व्याज दर ७.५ टक्क्यांपर्यंत सुधारित करू शकतात आणि आगाऊ मर्यादा सध्याच्या २५ लाख रुपयांवरून ३० लाखांपर्यंत वाढवू शकतात.

Powered By Sangraha 9.0