राष्ट्रपती मुर्मू उद्या प्रदान करणार ‘पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२३’

22 Jan 2023 18:51:58
Prime-Minister-National-Child-Award


नवी दिल्ली
: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दि.२३ जानेवारी रोजी ११ मुलांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२३’ प्रदान करणार आहेत. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधणार आहेत.कला आणि संस्कृती, शौर्य, नवोन्मेष, समाजसेवा, शिक्षण आणि क्रीडा यातील असामान्य कामगिरीसाठी मुलांना हे पुरस्कार दिले जातात.

 विविध क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या देशातील ११ बालकांना यंदा पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यामध्ये कला व संस्कृती अंतर्गत ४, धैर्यशाली कामगिरीअंतर्गत १, नवोन्मेषासाठी २, समाजसेवेसाठी १ आणि क्रिडा क्षेत्रातून ३ अशा ११ मुलांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. प्रत्येक विजेत्याला एक पदक, रोख एक लाख रुपये आणि प्रमाणपत्र दिले जाईल.

दरम्यान, महिला व बालविकास मंत्री स्मृती झुबिन इराणी २४ जानेवारी रोजी राज्यमंत्री डॉ. मुंजपारा महेंद्रभाई यांच्या उपस्थितीत मुलाशी संवाद साधून त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतील.









Powered By Sangraha 9.0