रुईया महाविद्यालयातील प्रसिद्ध चिपळूणकर व्याख्यानमाला

    21-Jan-2023
Total Views |ruiaमुंबई (प्रतिनिधी) :
शिक्षण प्रसारक मंडळींचे रुईया महाविद्यालय दरवर्षी विष्णुशास्त्री चिपळूणकर व्याख्यानमालेचे आयोजन करते. यंदा २३ , २४ आणि २५ जानेवारी या तीन दिवसांमध्ये व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी ही व्याख्यानमाला गेली ४८ वर्षे भूषवली आहे.

शिक्षण प्रसारक मंडळी या मातृसंस्थेच्या स्थापनेमागे विष्णुशास्त्री चिपळूणकरांची प्रेरणा होती. त्यांच्याविषयी ऋणभावना व्यक्त करण्यासाठी ही व्याख्यानमाला आयोजित केली जाते. विविध राजकीय , सामाजिक , सांस्कृतिक , शैक्षणिक इत्यादी क्षेत्रांतील तत्कालीन विविध प्रश्नांचा वेध घेणारी व्याख्याने यात आयोजित केली जातात. २०२२ या भारताच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने गेल्या ७५ वर्षांमधील भारताची संरक्षण सिद्धता , आरोग्य व्यवस्था आणि क्रीडा या तीन विषयांवर आधारलेली व्याख्याने आयोजित केली आहेत.


यंदा सोमवार दि. २३ रोजी डॉ. काशिनाथ देवधर हे 'आत्मनिर्भर भारत आणि संरक्षण सिद्धता' , मंगळवार दि. २४ रोजी डॉ. तात्याराव लहाने हे 'आरोग्य व्यवस्थेचा लेखाजोखा' आणि बुधवार दि. २५ जानेवारी रोजी सुनंदन लेले हे 'क्रीडा क्षेत्रातील भरारी' या विषयांवर मार्गदर्शन करतील. या व्याख्यानमालेचे आस्वाद घेण्यासाठी रुईया महाविद्यालयाने श्रोत्यांना येण्याचे आवाहन केले आहे.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.