काय आहे धर्म सेन्सॉर बोर्ड? 'पठाण'ला पुन्हा कात्री लागणार?

    21-Jan-2023
Total Views |
prayagraj-jyotish-math-constituted-dharma-censor-board-for-bollywood-and-ott-content

लखनऊ : बॉलीवूड चित्रपट, मालिका आणि OTT प्लॅटफॉर्मवरील कार्यक्रमांमध्ये सनातन धर्माचा अवमान केल्याच्या प्रकरणी धर्म सेन्सॉर बोर्डाची स्थापना करण्यात आली आहे. ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती धर्म सेन्सॉर बोर्डाची स्थापना केली आहे. या बोर्डाची मार्गदर्शक तत्त्वेही आता जाहीर करण्यात आली आहे. सर्व चित्रपटांचे पहिले शो पाहिल्यानंतर धर्म सेन्सॉर बोर्ड स्वतंत्र प्रमाणपत्र देईल. सर्व प्रथम २५ जानेवारी रोजी बॉलिवूड स्टार्स शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा वादग्रस्त चित्रपट पठाण धर्म सेन्सॉर बोर्डाकडून पाहीला जाणार आहे. तसेच हे बोर्ड इतर चित्रपटांकडेही लक्ष देणार आहे.
मार्गदर्शक तत्त्वे लवकरच निर्माता, दिग्दर्शक यांना कळवली जाणार आहेत. त्यानंतर बॉलीवूड चित्रपट, मालिका आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कंटेंटचे परीक्षण केले जाईल. बोर्डाचे सदस्य प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाचा पहिला शो पाहतील. आक्षेपार्ह मजकूर आढळल्यास, धर्म सेन्सॉर बोर्ड हा उतारे काढून टाकण्याची मागणी करेल. तसेच निर्माते, दिग्दर्शकांनी या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नाही, तर धर्म सेन्सॉर बोर्डाचे सदस्य चित्रपटावर कायदेशीर आणि सामाजिक कारवाई केली जाईल, असे स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी सांगितले.

ह्या समितीत खालील सदस्य असतील
 
ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती हे स्वतः धर्म सेन्सॉर बोर्डाचे मार्गदर्शक असतील. धर्म सेन्सॉर बोर्डात विविध प्रांतातील एकूण नऊ सदस्य ठेवण्यात आले आहेत. सुरेश मनचंदा यांची प्रमुख सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. डॉ पी एन मिश्रा, स्वामी चक्रपाणी महाराज, मानसी पांडे, तरुण राठी, कॅप्टन अरविंद सिंह भदोरिया, प्रीती शुक्ला, डॉ गार्गी पंडित आणि डॉ.धर्मवीर यांना सदस्य करण्यात आले आहे.




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.