दिवंगत मन्नान गोरे यांचे उल्हासनगरात स्मारक उभारणार - केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले

    21-Jan-2023
Total Views |

रामदास आठवले
 
 
मुंबई : आंबेडकरी चळवळीतील सर्व स्तरावरील कार्यकर्त्यांशी ऋणानुबंध असणारे धम्मसेवक म्हणून ही काम करणारे ; आंबेडकरी विचारांची बांधिलकी असणारे आणि जगभरात आपला मित्रपरिवार असणारे मन्नान गोरे यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची हानी झाली आहे. ते अनेक वर्षे उल्हासनगर येथे वास्तव्यास होते.

त्यांच्या स्मृती जोपासण्यासाठी उल्हासनगरात रस्त्याला किंवा चौकास दिवंगत मान्नान गोरे यांचे नाव देऊन त्यांचे उचित स्मारक उभारण्यासाठी आपण प्रयत्न करू असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले. रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दिवंगत मन्नान गोरे यांची जाहीर श्रद्धांजली सभा टाऊन हॉल उल्हासनगर येथे आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी ना.रामदास आठवले बोलत होते. यावेळी विचारमंचावर पद्मश्री कल्पना सरोज; रिपाइं चे राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे;सुरेश बारशिंग; रिपाइं चे जिल्हा अध्यक्ष उपमहापौर भगवान भालेराव आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

दिवंगत मन्नान गोरे यांनी पद्मश्री कल्पना सरोज यांचे नेतृत्व मजबूत करण्यात मोठा पाठींबा दिला होता. सामाजिक ; बौद्ध धम्म चळवळ आणि व्यावसायिक क्षेत्रात ही त्यांनी पद्मश्री कल्पना सरोज यांना पाठिंबा देण्याचे काम केले. त्यांनी जगभर प्रवास केला होता. आंबेडकरी चळवळीतील जगभरातील नेत्यांशी त्यांचे संबंध होते.ते नेहमी विविध क्षेत्रातील लोकांना माझी भूमिका सांगत असत. अनेक स्तरावर चळवळीतील कार्यकर्त्यांकडे माझ्या नेतृत्वाची चांगली बाजू मांडत असत. अनेक व्यापार कला क्षेत्रातील मान्यवरांच्या ते भेटी करून देत असत. परदेशांत माझ्या सोबत अनेकदा त्यांनी प्रवास केला आहे. त्यांच्या शी माझे जवळचे संबंध होते.त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने मला माझ्या मनाला दुःखाचा धक्का लागला आहे असे सांगत ना. रामदास आठवले यांनी दिवंगत मन्नान गोरे यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.