ईशान्य सीमेवर ‘प्रलय’ युद्धसराव

21 Jan 2023 18:40:09

भारतीय हवाई दल
 
 
नवी दिल्ली : भारतीय हवाई दलातर्फे ईशान्य भारतात एलएसीसह सर्व प्रमुख हवाई तळांवर युद्धसराव करणार आहे. ‘प्रलय’ असे या सरावाचे नाव असून त्यासाठी एस – ४०० ही हवाई सुरक्षा यंत्रणादेखील सक्रिय केली जाणार आहे. भारतीय हवाई दलातर्फे ईशान्य सीमेवरील सुरक्षाव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी प्रलय हा युद्धसराव करणार आहे. हवाई दलातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सरावात राफेल आणि सुखोई - ३० आणि अनेक वाहतूक आणि इतर विमानांसह प्रमुख लढाऊ उपकरणांचा समावेश असेल.
 
 
 भारतीय हवाई दलाने अलीकडेच इतर तळांवरून अनेक ईशान्येकडील भागात ड्रोन तैनात केले आहेत. सिक्कीम आणि सिलीगुडी कॉरिडॉरमध्ये ते तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या कारवायांवर नजर ठेवण्याची क्षमता वाढली आहे. न्य भारतात केलेला हा दुसरा कमांड-स्तरीय सराव आहे. शिलाँगमधील भारतीय हवाई दलाच्या तळावर संपूर्ण ईशान्येकडील हवाई तळाची जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे चीनच्या कारावायांवरदेखील ते लक्ष ठेवतात.
 
 
Powered By Sangraha 9.0