मोदींच्या दौऱ्यातून मुंबईकरांना 'या' गोष्टी मिळणार!

21 Jan 2023 11:12:03


मोदींच्या दौऱ्यातून मुंबईकरांना 'या' गोष्टी मिळणार!
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा राजकीय दृष्ट्या तर चर्चेत राहिलाच. पण मोदींच्या दौऱ्यानं मुंबईकरांना सुखावेल, अशा बऱ्याच गोष्टी दिल्या आहेत. मोदींनी नेमकं कोणत्या विकासकामांचं लोकार्पण केलंयं. त्याचा तुम्हा आम्हा सर्वसामान्यांच्या जीवनावर नेमका काय परिणाम होणार आहे .
सर्वात आधी जाणून घेऊयात मोदींनी उद्घाटन केलेल्या मेट्रो प्रकल्पांचा फायदा कुठल्या भागाला जास्त होणार आहे. मेट्रो मार्गिका ७ (अंधेरी पुर्व -दहिसर पुर्व ) तसेच मेट्रो मार्गिका २ अ ( दहिसर पुर्व-डी.एन. नगर) मार्गिकेचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. मेट्रो मार्गिका ७ ही मार्गिका १६.५ किमी ची असून त्या मार्गिकेवर १३ स्थानके आहेत. तसेच मेट्रो मार्गिका २ अ ही मार्गिका १६.५ किमी ची असून त्या मार्गिकेवर १७ स्थानके आहेत. या मेट्रो मार्गिकेमुळे प्रदूषण आणि वाहतूककोंडीपासून सुटका होऊन मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या मार्गिकांमुळे मुंबईकरांना १५ किमी अंतरासाठी फक्त ३० रुपये खर्च करून अर्धा तासांत आपल्याला हव्या त्या ठिकाणी पोहचता येणार आहे.त्यामुळे सुखद आणि स्वस्तात प्रवास आपण करू शकणार आहोत.
आता जाणून घेऊया मेट्रो २-अ चे फायदे काय आहेत ते?
१)या मेट्रोमुळे मुंबईतील दहिसर (पूर्व) ते डीएन नगर या सर्वात व्यस्त मार्गावरीलवाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.
२)तसेच ही मेट्रो मार्गिका दहिसर आणि डीएन नगर येथील लोकल सेवा आणि एमआरटी प्रणालीसह सुगम आणि कार्यक्षम आदानप्रदान करणे सुलभ होईल.
३) या मेट्रो २-अ मार्गिकेमुळे पश्चिम, मध्य मुंबई आणि उत्तर उपनगरी मुंबईदरम्यान प्रवासासाठीचा आणखी एक जलद पर्याय उपलब्ध होईल.
४) मुंबईतील व्यावसायिक आणि महत्त्वाच्या भौगोलिक ठिकाणांवर मेट्रो कनेक्टिव्हिटी मिळेल.
५)तसेच या मेट्रो मार्गिकेमुळे सध्याची प्रवासाची वेळ रस्त्याच्या परिस्थितीनुसार ५०% ते ७५% पर्यंत कमी होईल.
आता पाहूया मेट्रो ७ चे फायदे काय ते?
१)मेट्रो ७ या मेट्रोमुळे मध्य मुंबई आणि उत्तर उपनगरी मुंबई दरम्यान जलद कनेक्टिव्हिटी मिळेल.
२)या मार्गिकेमुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नॅशनल पार्क आणि इतर व्यावसायिक आणि महत्वाच्या ठिकाणी मेट्रो कनेक्टिव्हिटी मिळेल.
३)तसेच या मार्गिकेमुळे सध्याच्या प्रवासाची वेळ रस्त्याच्या परिस्थितीनुसार ५०% ते ७५% पर्यंत कमी होईल.
हे प्रकल्प ज्या ज्या भागातून जाणार आहेत, त्या भागातील झोपडपट्टी पूर्नवसनाला वेग येणार आहे. म्हणजे झोपड्यांमध्ये रहाणाऱ्या प्रत्येक मुंबईकराला एसआरए नियमावलीनुसार घरे उपलब्ध होतील. वेगवान आणि गतीमान प्रवास मुंबईकरांना शक्य होणार आहे. येत्या काळात मुंबई आणि महामुंबईतील सर्वच शहरे मेट्रोच्या जाळ्यांनी विणली जाणार आहेत. त्यात ही सर्व स्थानकं सर्वच टप्प्यांशी जोडली गेलेली आहेत. त्यामुळे मुंबईकरांचा गर्दीतल्या लोकलप्रवासातून काहीसा दिलासा मिळणार आहे.
मोदींनी मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्नही सोडविण्याचा प्रयत्न केला आहे.
कोरोना काळात सर्वसामान्य मुंबईकरांना झालेल्या त्रासाची कल्पना आपल्याला आहेच. पंरतू आता मुंबईकरांना आधुनिक सोईसुविधांनी सुसज्ज अशाप्रकारच्या रूग्णाल्यात उपचार घेता यावा यासाठी मुंबई महापालिकेच्या ३ रूग्णालयांचे ११०८ कोटी खर्चासह बांधकाम आणि पुनर्विकास केला जाणार आहे. यामुळे २५ लाख गरजू रूग्णानां लाभ मिळणार आहे. तसेच मुंबई महापालिकेच्या २० नवीन हिंदूहद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे लोकार्पन होणार आहे. त्या दवाखान्यात १४७ रक्त चाचण्या मोफत होणार आहेत. तसेच तज्ञ्ज्ञ डॉक्टराचा मोफत सल्ला ही उपल्बध करून दिला जाणार आहे. यामुळे हे सरकार मुंबईकरांची आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणारे सरकार आहे यांत तिळमात्र शंका नाही.
मुंबईतल्या सांडपाण्याचा निचरा ही एक मोठी समस्या... पण त्यावरही सरकारनं उत्तर शोधलंयं...
पाण्याच्या वापरानंतर जे पाणी अशुद्ध होउन पुनर्वापरास लायक नसते असे पाण्याला सांडपाणी असे म्हणतात. आजच्या युगात सांडपाणी हे मानवी तसेच औद्योगिक वापरातून तयार होते. त्यामुळे १७, १८२ कोटीचे ७ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भुमिपूजन होणार असून यांमुळे मुंबईचा सांडपाण्याचा मोठा प्रश्न सोडवले जाणार आहे. तसेच प्रतिदिन २४६४ दशलक्ष लीटर सांडपाण्याचा योग्य पद्धतीने निचर केला जाणार आहे. त्यामुळे मोदी सरकारकडून होणारा हा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प हा सर्वसामान्याच्या हिताचा असा आहे.
पावसाळ्यातील मुंबईकरांची समस्या म्हणजे मुंबईतील खड्डेमय रस्ते... मुंबईत रस्त्याची समस्या ही अंत्यत महत्तवाची समजली जाते . ठाकरे सरकारच्या काळात रस्त्याची झालेली चाळण आपण पाहिलीच असेल अशा पार्श्वभूमीवर ६०७९ कोटी रूपये खर्च करून ४०० किमी रस्त्याचे कॉक्रिटीकरण केले जाणार आहे. त्यामुळे रस्त्यावर होणाऱ्या अपघातपासून सर्वसामान्य मुंबईकराचे संरक्षण होणार आहे.
त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वेस्थानकाचा १८१३ कोटी खर्चासह पुनर्विकास होणार असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वेस्थानकाला वारसा स्थळ म्हणून जतन केले जाणार आहे. त्यामुळे स्थानकावर प्रशस्त रूफ प्लाझा ,कॅफेटेरिया, मनोरंजनाच्या सुविधा,सुधारित सरफेस ,पूर्णपणे आच्छादित प्लॅटफॉर्म,रोषणाई,मार्ग शोधक/दाखवणारे चिन्हे, ध्वनीशास्त्र, सुरक्षित-सीसीटीव्ही, प्रवेश नियंत्रण,सौर ऊर्जा, जल संवर्धन आणि पुनर्वापर, झाडाचे सुधारीत आच्छादन , लिफ्ट/एस्केलेटर,फूड कोर्ट, प्रतीक्षा कक्ष, मुलांना खेळण्यासाठी जागा, स्थानिक उत्पादनांसाठी जागा, वाहतुकीची व्यवस्था, ‘ग्रीन बिल्डिंग’चे तंत्रज्ञान ,अपंगांसाठी अनुकूल सुविधांची विशेष काळजी सुद्धा घेतली जाणार आहे.
तसेच प्रधानमंत्री स्वनिधी योजनेंतर्गत १ लाखहून अधिक फेरीवाल्यांना कर्ज वितरण केले जाणार आहे. यामुळे मोदी सरकार हे मुंबईतील सर्वसामान्याच्या हिताच सरकार असल्याचे पाहायला मिळत.यामुळे फेरीवाल्याकडून ही स्वताच हक्कांच सरकार सत्तेत असल्याचे ही म्हणटले जात आहे. त्यामुळे अधिक किरकोळ उद्योग सुरू होऊन मुंबईतील आर्थिक उलाढाल वाढेल. अर्थात वरील सर्वच योजनांचा फायदा शेवटी मुंबईकरालाच होणार आहे.
Powered By Sangraha 9.0