महारोजगार मेळाव्याचे कांदिवली येथे आयोजन

    21-Jan-2023
Total Views |

कांदिवली

मुंबई : महाराष्ट्र शासन कौशल्य विकास उद्योजकता विभाग मुंबई उपनगर व पंडित दिनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे कांदिवली पश्चिम गोरसवाडी मैदान येथे आमदार योगेश सागर यांच्या विशेष प्रयत्नांतुन आयोजन करण्यात आले, या मेळाव्याचे उद्घाटन मा खासदार गोपाळ शेट्टी आमदार योगेश सागर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले, यावेळी शासनाच्या वतीने रोजगार विभागाचे, सहायक आयुक्त खंदारे, उपस्थित होते, गणेश खणकर, निखिल व्यास, माजी नगरसेवक दिपक बाळा तावडे, कमलेश यादव, नगरसेविका लिनाबेन दहेरकर, नगरसेविका प्रियंका मोरे, नगरसेविका प्रतिभा गिरकर, योगेश पडवळ, ठाकुर संजय सिंह हे उपस्थित होते.
 
यावेळी एकुण ३५०० बेरोजगार तरुण-तरुणींनी नोकरी साठी नाव नोंदणी केली, ५० मान्यता प्राप्त कंपनीन या महारोजगार मेळाव्यात सहभागी झाले, तरुण -तरुणींना तात्काळ नोकरीचे हमीपत्र देण्यात आले, हा महारोजगार यशस्वी करण्यासाठी, हिमांशू पारेख,शैलेन मेहता, प्रथमेश साळगावकर, रेश्मा टक्के, रुपाली चाळके, प्रमोद गुजर, किशोर विठ्लानी, यांनी विशेष प्रयत्न केले.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.