महाराष्ट्रातील कांदवळवन कक्षाचे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत कौतुक

21 Jan 2023 13:23:51

CM meeting



मुंबई (प्रतिनिधी) : कांदळवनाच्या वाढीसाठी आणि संवर्धनासाठी महाराष्ट्रात कांदवळवन कक्ष आणि फाऊंडेशन कार्यरत आहे. कांदळवनाच्या वाढीसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नाबद्दल महाराष्ट्राचे कौतुक केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांकडुन करण्यात आले. मुंबईतील वर्षा या निवासस्थानी मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय पर्यावरण , वने व कामगार मंञी भुपेंद्र यादव यांच्या समवेत ही बैठक झाली.



केंद्रीय मंत्र्यांसमवेत झालेल्या या बैठकीत वन, कामगार, पर्यावरण, आरोग्य, कौशल्य विकास या विभागाशी संबंधीत विविध बाबींवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. पश्चीम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेञ याबाबत प्राथमिक अधीसुचना प्रसिद्ध केल्या आहेत. राज्य शासन विभाग आणि केंद्रीय वन विभागाच्या तज्ञ समिती सोबत बैठक घेऊन प्रस्ताव करण्याच्या सूचना देण्यात आल्या. व्याघ्रप्रकल्प , अभयारण्ये यांच्या अंर्गत येणाऱ्या गावांना पुनर्वसनासाठी मदत वाढवण्यासंदर्भात तसेच वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात होणारी मनुष्य हानी किंवा पीक हानी यावर ही मदत देण्याविषयी या बैठकीत चर्चा झाली आहे. यावेळी मुलुंड येथे वैद्यकिय महाविद्यालय सुरू करण्यावीषयीची ही घोषणा केली गेली.

 
या बैठकीवेळी राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, कामगार मंत्री सुरेश खाडे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, कामगार विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, वन विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, पर्यावरण विभागाचे सचिव प्रवीण दराडे, आरोग्य विभागाचे सचिव नवीन सोना, कामगार आयुक्त सुरेश जाधव ईत्यादी मंञी यावेळी उपस्थित होते.

Powered By Sangraha 9.0