एमपीएससीचा अर्ज भरताना या चूका टाळा!

21 Jan 2023 18:31:30
Avoid these mistakes while filling MPSC application



महाराष्ट्रातील अनेक तरूण दरवर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी अर्ज करत असतात. पंरतू अर्जातील चुकामुळे अनेकांना परीक्षेला बसता येत नाही.त्यामुळे अशाच तरूणासाठी अर्ज भरताना कोणत्या चूका टाळाव्यात हे खालील मुद्द्याच्या आधारे सांगितलेले आहे.

१) शांत जागा , वेगवान इंटरनेट, कागद पेन घेऊन बसावे.

२) जाहीरात नीट वाचा.सगळी माहिती समजून घ्या.त्याशिवाय अर्ज भरू नका.

३) आपला फोटो,सही स्कॅन करून ठेवा, कागदपत्रं जवळ ठेवा.

४) परीक्षेच्या केंद्राची माहिती काळजीपुर्वक भरा .

५) अर्ज पुर्ण भरला आहे की नाही, यांची खातरजमा करा.

६) अर्ज दुसऱ्याला भरायला देऊ नये आणि तुम्ही दुसऱ्यांचा अर्ज भरू नका.

७) गटाने अभ्यास करा पण गटाने अर्ज भरू नका.

८) एकाच नावाने दोनदा अर्ज भरू नका.

९) जात प्रमाणपत्र बाबत चालढकल करू नका. नंतर अडचणी वाढतात.

१०) रजिस्ट्रेशन नंबर जपून ठेवा. तो हरवू नका.

११) तसेच सर्वात महत्तवाचं म्हणजे, अर्ज भरण्यासाठी शेवटच्या तारखेची वाट पाहू नका.










Powered By Sangraha 9.0