जागतिक क्रिएटिव्ह समिट २०२३ परिषदेत २०० हून अधिक शिक्षक एकत्रित

20 Jan 2023 19:37:52
World Creative Summit 2023



मुंबई
: परिसर आशा या मुंबईस्थित संस्थेने खाजगी विनाअनुदानित शाळा व्यवस्थापन संघटना (PUSMA) च्या सहकार्याने आयोजित केलेल्या रीइमेजिनिंग एज्युकेशन २.० या जागतिक क्रिएटिव्ह समिट २०२३ च्या परिषदेत शैक्षणिक क्षेत्रात झालेल्या नवनवीन बदलांचा आणि तंत्रांचा पुनर्शोध घेण्यासाठी २०० हून अधिक शिक्षक एकत्रित आले.

या कार्यक्रमास दिल्लीस्थित NCERT च्या कला आणि सौंदर्यशास्त्र विभागाच्या प्रमुख आणि प्राध्यापिका डॉ. पवन सुधीर ह्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. तसेच या चर्चा सत्रात शिक्षण क्षेत्रातील नामांकित वक्त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी परिसर आशाने `लाइटहाऊस' हे मोफत ई-मासिक प्रकाशित केले. मुलांसाठी परिसर आशाचा हा एक विशेष उपक्रम आहे, ज्यामध्ये मुलांनी रेखाटलेली रेखाचित्रे, चित्रे, कथा, निबंध, कविता आणि इतर अनेक गोष्टी प्रकाशित केल्या जातील. ज्यामुळे मुलांच्या सर्जनशीलतेला वाव मिळेल. लाइटहाऊसच्या पहिल्या ई-मासिकाची प्रस्तावना महाराष्ट्राचे माननीय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी लिहिली आहे.

या अनोख्या परिषदेचा समारोप ग्लोरिया डी'सुझा इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड-बेस्ट एज्युकेटरच्या पारितोषिक वितरण समारंभाने झाला, ज्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सर्व विजेत्यांना कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ. पवन सुधीर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.









Powered By Sangraha 9.0