घोटाळेबाजांना तुम्ही पदे दिलीच कशी ?

20 Jan 2023 19:54:26
किरीट सोमय्या

मुंबई: 'उद्धव ठाकरे गटाच्या प्रत्येक नेत्यावर काही ना काही आरोप आहेत. कुणावर भ्रष्टाचार तर कुणावर गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी तर घोटाळा कसा करावा आणि फसवणूक कशी कारवाई याची जणूकाही मक्तेदारीच घेतली आहे. अनिल परब यांनी साई रिसॉर्टबाबत केलेला व्यवहार आणि संजय राऊतांनी सुजित पाटकरांसोबत केलेला गैरहव्यवहार यातून ठाकरे गटाच्या नेत्यांची भ्रष्ट प्रतिमा जगासमोर आली आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या भ्रष्ट नेत्यांना आणि घोटाळेबाजांना तुम्ही पदे दिलीच कशी ?' असा सवक भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे.

यांच्याकडे लक्ष देण्याची विनंती करणार
किरीट सोमय्या म्हणाले की, 'मी तर आता आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विनंती करणार आहे की या भ्रष्ट नेत्यांवर कारवाई करा. विशेषत्वाने पेडणेकर,संजय राऊत आणि अनिल परब यांच्यामार्फत अनेकांची फसवणूक झाली आहे. पेडणेकरांनी एसआरए आणि इतर बाबींमध्ये केलेल्या गैरव्यवहाराची बाब तर स्पष्टपणे उघडकीस आलेली आहे. त्यामुळे मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या तिन्ही नेत्यांवर लक्ष ठेवण्याची विनंती करणार आहे.







Powered By Sangraha 9.0