‘यादों की बहार’ या चॅरिटी गायन मैफिलीचे ११वे पर्व उत्साहात

    20-Jan-2023
Total Views |

गायन मैफिली

मुंबई : ‘कोविड-१९’ मुळे दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ‘डॉ. बत्राज पॉझिटिव्ह हेल्थ फाऊंडेशन’ने त्यांची प्रतिष्ठित वार्षिक गायन मैफिल ‘यादों की बहार’च्या ११व्या पर्वाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कार-प्राप्त व डॉ. बत्राज ग्रुप ऑफ कंपनीज’चे संस्थापक डॉ. मुकेश बत्रा यांनी सदाबहार गाण्यांची मेडली सादर केली. भारतीय पार्श्वगायक व संगीत दिग्दर्शक रूप कुमार राठोड यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती दाखवत वार्षिक ‘चॅरिटी गायन मैफिली’ची शोभा वाढवली.

 ‘यादों की बहार’ हा बहुप्रतिक्षित कार्यक्रम आहे, जो ‘शेफर्ड विडोज होम’मधील वृद्ध विधवांना मदत करत आहे. ‘डॉ. बत्राज फाऊंडेशन’द्वारे या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. ‘डॉ. बत्राज फाऊंडेशन’ वृद्ध महिलांच्या आरोग्याची काळजी घेत आहे आणि त्यांना गेल्या 30 वर्षांपासून मोफत वैद्यकीय केअर सेवा देत आहे. या प्रसंगी भारतात होमिओपॅथीचा प्रसार लोकप्रिय करण्यासाठी ‘होमियोपॅथी अँथम’ लॉन्च करण्यात आले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.