केईएम रुग्णालयात सुरू होणार ‘आयव्हीएफ’ केंद्र!

02 Jan 2023 16:23:25

KEM hospital


मुंबई : मुंबईतील शासकीय रुग्णालय असलेल्या कामा रुग्णालयात नव्या वर्षात सर्वसामान्यांकरिता आयव्हीएफ केंद्र सुरू होणार आहे. त्याचबरोबर आता शासकीय रुग्णालयातील या पहिल्याच केंद्रानंतर आता केईएम रुग्णालयातही ‘आयव्हीएफ’ केंद्र सुरू होणार आहे. डॉ. अंजली व अनिरुद्ध मालपानी या दाम्पत्याने यासाठी पुढाकार घेतला असून, लवकरच केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. डॉ. मालपानी हे ’केईएम’ रुग्णालयाचे माजी विद्यार्थी असून, सर्वसामान्य जोडपे जीवनशैली व अन्य बदलांमुळे अपत्यापासून वंचित राहू नये, या विचारातून हे पाऊल त्यांनी उचलले आहे.

दरम्यान, ‘केईएम’मध्ये वंध्यत्वावर उपचार करण्यासाठी ’आयव्हीएफ’ केंद्र सुरू होत असल्याने सामान्य नागरिकांना त्याचा विशेष फायदा होणार आहे. ३० वर्षांपूर्वी डॉ. मालपानी यांनी परदेशात जाऊन वंध्यत्व या विषयावर प्रशिक्षण घेतले होते. त्या प्रशिक्षणाचा फायदा सर्वसामान्य जोडप्यांना व्हावा, यासाठीच डॉ. मालपानी यांच्या पुढाकाराने ’आयव्हीएफ’ केंद्र सुरू होणार आहे. या ’आयव्हीएफ’ केंद्राच्या माध्यमातून दरवर्षी जवळपास १०० रुग्णांवर उपचार केले जाणार आहे.
Powered By Sangraha 9.0