धर्मो रक्षति रक्षितः ; लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्याविरोधासाठी हिंदू एकवटणार!

एक दिवस धर्मासाठी! पुण्यात २२ जानेवारी रोजी हिंदू जनआक्रोश मोर्चा

    19-Jan-2023
Total Views | 180

MahaMTB


पुणे: सकल हिंदू समाजाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या रविवारच्या हिंदू जन आक्रोश मोर्चाची जय्यत तयारी पुण्यात सुरु झाली असून दि.१९ जानेवारी रोजी लाल महाल परिसरात नियोजनासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये विविध विषयांवर चर्चा होऊन मोर्चा यशस्वी करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आल्याची माहिती पतित पावन संघटनेचे स्वप्निल नाईक यांनी दै.मुंबई तरुण भारतशी बोलताना दिली. हा मोर्चा शांततामय वातावरणात निघेल अशी ग्वाही देऊन पोलीस खात्याने यासाठी सहकार्याची भूमिका दर्शविली असल्याची माहिती त्यांनी दिली.

यासंदर्भात वाहन व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करुन देणे अशा बाबींवर चर्चा होऊन शहरातील असंख्य हिंदुत्ववादी संघटना सक्रिय झाल्या आहेत, असे ते म्हणाले. यासाठी व्यापारी, विद्यार्थी, वारकरी, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रत्येक घरातील सदस्य सहभागी व्हावा यादृष्टीने प्रयत्न केले जात असून महिलांनी तर या मोर्चात सहभागी होण्यासाठी आपला संक्रांतीनिमित्तचा हळदी-कुंकवाचा कार्यक्रम देखील पुढे ढकलला आहे. आजच्या या बैठकीमध्ये राजे शिवराय प्रतिष्ठानचे महेश पवळे, पतित पावनचे स्वप्निल नाईक, हिंदू गर्जना प्रतिष्ठानचे धीरज घाटे, श्री शंभू चरित्रचे अभ्यासक निलेश भिसे, मातृशक्तीच्या नलिनी वायाळ, विश्व हिंदु परिषदेचे किशोर चव्हाण, शिवसमर्थ प्रतिष्ठानचे दिपक नागपुरे तसेच शिवप्रतिष्ठानचे संजय पासलकर उपस्थित होते.







अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121