खोडद मधील रेडीओ दुर्बिणीने लावलाय अनोखा शोध ;

17 Jan 2023 18:48:16

 



GMRT

 



मुंबई (प्रतिनिधी) :
पुणे जिल्ह्यातील जीएमआरटी म्हणजेच जायंट मेट्रोवेव्ह रेडिओ टेलीस्कोप (GMRT) या खोडद येथे असलेल्या महाकाय दुर्बिणीद्वारे केलेल्या निरीक्षणांचा वापर करत सुदूर अंतरावरच्या आकाशगंगेतील आण्विक हायड्रोजनमधून येणाऱ्या रेडिओ संकेतांचा शोध लावला आहे.


कॅनडा येथे असलेल्या मॅकगिल विद्यापीठ आणि बंगळुर येथील भारतीय विज्ञान संस्थेतील खगोल शास्त्रज्ञांनी खोडद येथील महाकाय दुर्बिणीद्वारे हे निरीक्षण केले आहे. या शोधाचे निष्कर्ष ब्रिटनमधील रॉयल एस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आले आहे. रेडीओ खगोल विज्ञानात २१ सेंटीमीटर उत्सर्जन निरीक्षण पद्धतीमधील हा आत्तापर्यंतचा अद्वितीय शोध मानला गेला आहे.


“आकाशगंगा दरम्यान असलेल्या हायड्रोजन ढगांचा शोध घेणे हा जीएमआरटीच्या महत्वाच्या उद्देशांपैकी एक आहे. त्यादृष्टीने हे एक उल्लेखनीय पाऊल आहे”, अशी प्रतिक्रिया जीएमआरटीचे संचालक प्रमुख डॉ. यशवंत गुप्ता यांनी दिली आहे.
Powered By Sangraha 9.0