संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून

13 Jan 2023 18:55:58
अर्थसंकल्पीय अधिवेशन
नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास ३१ जानेवारीपासून प्रारंभ होणार असून ते ६ एप्रिलपर्यंत चालणार आहे. दोन टप्प्यात होणाऱ्या अधिवेशनामध्ये ६६ दिवसात २७ बैठका होणार आहेत.
केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाविषयी माहिती दिली. ते म्हणाले, संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून प्रारंभ होणार असून ते ६ एप्रिलपर्यंच चालणार आहे. यावेळी राष्ट्रपतींचे अभिभाषण, केंद्रीय अर्थसंकल्पाचे सादरीकरण आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आभार प्रस्तावावर चर्चा होणार आहे. यावेळी ६६ दिवसात २७ बैठका होणार आहेत. अधिवेशनाचा पहिला टप्पा १४ फेब्रुवारी रोजी संपणार असून त्यानंतर १२ मार्चपर्यंत सुटीचा कालावधी असेल, असेही केंद्रीय मंत्री जोशी यांनी सांगितले आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचा यंदाचा अखेरचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. पुढील वर्षी लोकसभा निवडणुक होणार असल्याने २०२४ सालचा अर्थसंकल्प हा अंतरिम असेल. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
 
Powered By Sangraha 9.0