मुलासाठी वडिलांनी घेतली माघार, सत्यजित तांबेंना नाशिकमधून उमेदवारी

12 Jan 2023 18:37:25
नाशिक : पदवीधर निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सत्यजित तांबे आणि सुधीर तांबे दाखल झाले. सत्यजित तांबे यांना काँग्रेसकडुन उमेदवारी मिळाली आहे. पण, यांनी नाशिक शिक्षण मतदारसंघ निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार अर्ज भरल्याची माहिती समोर आली आहे.
अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असलो तरी मी काँग्रेसचाच उमेदवार आहे. कॉंग्रेस पक्षाने डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात ठरवलं होतं. मात्र, सुधीर तांबे यांनी मुलासाठी माघार घेतली. पण सत्यजित यांना उमेदवारी मिळण्यास कमी कालावधी उरला. त्यामुळे त्यांना अपक्ष म्हणून निवडणुक लढवावी लागणार. आज अर्ज भरण्याची अखेरची तारीख होती. तांत्रिक काही अडचणीमुळे मी दोन अर्ज भरले आहेत. मात्र मला आता अपक्ष म्हणून निवडणुक लढवावी लागणार. सर्वांनी मला मदत करावी अशी विनंती मी करणार आहे. असं ते म्हणाले.
Powered By Sangraha 9.0