अमेरिका येथील विमानसेवा ठप्प, 4 हजार उड्डाणांना फटका

12 Jan 2023 18:58:43

अमेरिका

अमेरिकेची विमानसेवा ठप्प, 4 हजार उड्डाणांना फटका

मुंबई : संगणकातील बिघाडानंतर संपूर्ण अमेरिकेतील सर्व उड्डाणे ठप्प झाली आहेत. फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या संगणक प्रणालीतील त्रुटीमुळे संपूर्ण यूएसमधील सर्व उड्डाणे ग्राउंड करण्यात आली आहेत. यामुळे अमेरिकेतील विमानतळांवर एकच गोंधळ उडाला आहे. युएस फेडरल एविएशन अॅडमिनिस्ट्रेशन प्रणालीअंतर्गत पायलट आणि इतर उड्डाण कर्मचाऱ्यांना संबंधित धोक्यांविषयी माहिती दिली जाते. तसंच, सामान्य कामजांवरही देखरेख केली जाते. मात्रा, आता याच यंत्रणेतून कोणतीही माहिती पुरवली जात नाहीय. त्यामुळे अमेरिकेतील सर्व विमान सेवा ठप्प झाल्या आहेत.
 
 
अमेरिकी नागरिक उड्डान नियामकच्या संकेतस्थळानुसार ही माहिती देण्यात आली आहे. अमेरिका चॅनेल एनबीसीला दिलेल्या एका माहितीत एफएएने म्हटलं आहे की, एफएएने नोटीस टू एअर मिशन सिस्टमसाठी काम करत आहेत. आम्ही अडचणी वेरिफाय करत आहोत. यासाठी सिस्टमला पुन्हा उघडण्यात येणार आहे. नॅशवनल फ्लाय झोन सिस्टममध्ये बिघाड झाला आहे. अडचणी दूर करण्यासाठी वेगाने काम सुरू आहे. लवकरच हा बिघाड दुरुस्त करण्यात येईल.
 
 
अमेरिकेच्या वेळेनुसार सकाळी ५.३१ वाजता अमेरिकेच्या आतमध्ये आणि बाहेर एकूण ४०० उड्डाणांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे ही उड्डाणे आता उशिराने पोहोचणार आहेत. आतापर्यंत एकूण 760 उड्डाणे रद्द किंवा उशीराने ऑपरेट केली जात आहेत. फ्लाइट ट्रॅकर FlightAware.com नुसार, 91 फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या आहेत.
   
 
Powered By Sangraha 9.0