काश्मीर फाईल्स ऑस्करच्या पहिल्या यादीत

10 Jan 2023 12:43:41

kashmir
 
 
मुंबई : विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द काश्मीर फाईल्स ह्या चित्रपटाची २०२३ साली दिल्या जाणाऱ्या ऑस्कर साठी निवड झाली आहे. याबद्दल विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट करून आपला आनंद व्यक्त केला. द अकादमीच्या पहिल्या यादीत या चित्रपटाची निवड करण्यात आली. यासाठी एकूण ५ भारतीय चित्रपटांची निवड झाली आहे. पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, अनुपम खेर हे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या श्रेणीसाठी निवडले गेले आहेत.
 
 
 
Powered By Sangraha 9.0