"ठाकरेंची शिवसेना दाऊदचे प्रचारक म्हणून काम करतेय!"

08 Sep 2022 13:25:55
yakub
 
मुंबई : "उद्धव ठाकरेंची शिवसेना भारताच्या अखंडतेच्या जीवावर उठलेल्या दौड इब्राहिमचे प्रचारक म्हणून काम करत आहे" असा घणाघाती आरोप भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे. आतापर्यंत उद्धवव ठाकरे हे दाऊदचे समर्थक म्हणून काम करत होते. १९९३च्या बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी असणाऱ्या याकूब मेमनच्या कबरीच्या संवर्धनाचा कार्यक्रम आता त्यांनी हाती घेतला आहे. हेच उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व आहे का? यासाठी आता आदित्य ठाकरेंच्या पेंग्विन सेनेने कबर बचाव कार्यक्रम जाहीर करावा असे आव्हानही शेलारांनी दिले.
 
 
ही पेंग्विनसेना फक्त दाऊदची समर्थकच नाही तर, याच याकूबला फाशी देऊ नका म्हणून पात्र लिहिणाऱ्या अस्लम शेख हे मुंबईचे पालकमंत्री असताना स्वतःला आदित्य ठाकरेंचे भाऊ म्हणवून घेत होते हे उद्धव ठाकरेंना कसे काय चालले? शहरातील सर्वच स्मशानभूमी, कबरस्तान यांची जबाबदारी ही पालिकेकडेच असते. मुंबई महापालिकेत शिवसेना सत्तेत आहे, मग उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादानेच हे याकूब मेमनच्या कबरीचे सुशोभीकरण झाले आहे का? असे सवालही आशिष यांनी विचारले आहेत.
 
 
२०१५ साली फडणवीस सरकारनेच या याकूबला फाशी दिली. पण उद्धव ठाकरेंनी हे काम तुकडे तुकडे गॅंगच्या दबाबावाखाली केले आहे. याच गॅंगला अफझल गुरु मेल्याचे दुःख झाले होते, त्यांना आता याकूबला पुन्हा जिवंत करायचे आहे. त्यामुळेच आता त्याच्या थडग्यातून जोपासत आहेत. पेंग्विनसेनेला स्वतःचे अस्तित्वच नाही हेच यावरून सिद्ध होते आहे असे आरोप करत आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंचे हिंदूंविरोधी बेत उघडकीस आणले आहेत.
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0