ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत दसरा मेळावा करावा

07 Sep 2022 18:04:59
 deepak kesarkar
 
 
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या विचारांवर चालतात. दसरा मेळावा त्याचाच एक भाग आहे. त्यामुळे दसरा मेळावा शिंदे गटाचा होईल असे सांगून राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी, उद्धव ठाकरेंनी दसरा मेळावा घेतला तर त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला स्टेजवर बोलवावे, म्हणजे लोकांना कळेल कोण बाळासाहेबांच्या विचारापासून दूर गेले आहे, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
 
 
कोर्टाच्या सुनावणीवर मी बोलणार नाही
 
सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर मी बोलणार नाही, जे काही होईल ते कायद्याने होणार आहे. प्रकरण न्यायालयात असल्याने त्यावर चर्चा करणेही योग्य होणार नाही, असे ते म्हणाले. तसेच "सध्याची संख्या बघितली तर मुंबई महापालिकेत भाजपा आणि आमचे १५० नगरसेवक येतील", असा दावा देखील केसरकरांनी केला.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0