छत्तीसगड: IED स्फोटात एका CRPF जवानाचा मृत्यू!

29 Sep 2022 12:45:02

Chhattisgarh nexals blast
 
 
छत्तीसगड:  विजापूर जिल्ह्यात नक्षलवाध्यांनी ईडीआय स्फोट घडवून आणला. या स्फोटात सीआरपीएफचा एक जवान जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. सीआरपीएफच्या 196 व्या बटालियनचे एक पथक क्षेत्र वर्चस्वाच्या मोहिमेवर निघाले असताना धर्मराम गावातील चिंतावागु नदीजवळ संध्याकाळी 6:30 वाजता ही घटना घडली, असे विजापूरचे पोलीस अधीक्षक अंजनेया वार्ष्णेय यांनी 'पीटीआय'ला सांगितले.
 
 
बटालियनचा कॅम्प राज्याची राजधानी रायपूरपासून 400 किमी अंतरावर धर्मराम येथे आहे. गस्ती पथकाने परिसराला वेढा घातला असताना हवालदार सतपाल सिंग स्फोटाच्या आघाताखाली आला आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला, असे त्यांनी सांगितले. हरियाणाचा मूळ रहिवासी असलेल्या जवानाचा मृतदेह विजापूरला हलवण्यात येत आहे, असे वार्ष्णेय यांनी सांगितले.
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0