आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडे खंडणीची मागणी

दिराच्या खुनाची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा

    25-Sep-2022
Total Views |
misal  
 
पुणे : आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडे गेल्या काही दिवसापासून खंडणीसाठी मागणी केली जात होती. जर रक्कम दिली नाही तर त्यांच्या दिरांना जीवे मारले जाईल अशी धमकी मिळाल्यानंतर याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी माजी नगरसेवक दीपक धोंडिबा मिसाळ यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी इम्रान समीर शेख (रा. विकासनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
 
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीपक मिसाळ यांचा मोबाईल तसेच आमदार माधुरी मिसाळ यांचा जनसंपर्कासाठीच्या क्रमांकावर खंडणीचे संदेश येत होते. शिवाय अन्य एका क्रमांकावर पैसे न दिल्यास दीपक मिसाळ यांना जीवे मारण्याच्या धमकीचा संदेश आला.त्यानंतर दीपक मिसाळ यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.