मोदींनी आणलेले चित्ते पाहायला जाणार अन् एक चित्ता घेऊन येणार

25 Sep 2022 20:37:09
athavale
 
 
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेले चित्ते पाहण्यासाठी आपण जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पुण्यात दिली.भारतात आणलेले चित्ते आम्ही अजून पाहिलेले नाहीत. पण नॅशनल पार्कमधल्या एका चित्त्याला आम्ही दत्तक घेतलं आहे. पंतप्रधान मोदींनी आणलेले चित्ते मी पाहायला जाणार आहे. आणि मिळाले तर तिथून एक चित्ता घेऊन येणार आहे, असे ते येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
 
"देवेंद्र फडणवीस हे गेली पाच वर्ष मुख्यमंत्री होते. ते पाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र चालवू शकतात. फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहा जिल्ह्यांची जबाबदारी दिली असून, ते चांगल्या पद्धतीने सांभाळू करतात. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कोणत्याही प्रकारची नाराजी नसून, नाराजी पसरवण्याचे काम सध्या सुरू आहे." अशा शब्दांत रामदास आठवले यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.
 
 
 
Powered By Sangraha 9.0